आरंभ मराठी / भूम
एकीकडे नवरात्र उत्सवात नारीशक्तीचा सन्मान करत असताना दुसरीकडे भूम तालुक्यात एका आठ वर्षीय बालिकेवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
यासंबंधी सविस्तर वृत्त असे की, भूम तालुक्यातील एका गावातील एक 7 वर्ष 11 महिन्याची मुलगी (नाव- गावगोपनीय) ही दिनांक 23 सप्टेंबर रोजी रात्री आजोबाकडे शेतात जात होती.
त्यावेळी गावातील एका तरुणाने त्या मुलीला घराच्या पाठीमागे वड्याकडे चल असे म्हणून जबरदस्तीने तिला घेऊन जाऊन तिच्यावर लैंगीक अत्याचार केला.
पिडीत मुलीच्या आईने दिनांक 24 सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64, 64(2), सह पोक्सो 4, 6, 8, 12 अन्वये संबंधित नराधमावर गुन्हा नोंदवला आहे.