१० लाखांचे नुकसान आणि २ लाखांची चोरी
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव तालुक्यातील ढोकी येथील महाबीज च्या बीज गुणन केंद्र आणि शासकीय रोपवाटिकेच्या जागेवर अतिक्रमण करून १० लाखांचे नुकसान केले आहे तर तेथील २ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी ४२ जणांवर ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील आरोपी बाबासाहेब आप्पा चव्हाण, नाना कलाप्पा चव्हाण आणि इतर ४० जणांनी (रा. राजेश नगर, पारधी पिडी, ढोकी) दिनांक २९ जानेवारी २०२५ रोजी दुपारी तीन वाजता ढोकी येथील जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटीका व तालुका बिज गुणन केंद्र ढोकी येथील शेतातील (गट नं ३५) १६ हेक्टर ६८ आर जमिनीवर बेकायदेशीर अतिक्रमण केले होते. त्यांनी तेथील चार शेडनेट हाउसचा कपडा फाडून अंदाजे ५० हजारांचे नुकसान केले.
तसेच पॉलीथीन कापड अंदाजे २ लाख २५ हजार व सिडकोमधील ४० आंब्याची झाडे, १५ डाळींबाची झाडे, ५ चिक्कुची झाडे, १०० पेरुची झाडे अशी रोपवाटीकेतील १० हजार रोपे उपटून १० लाखांचे नुकसान केले.तसेच बिज प्रक्रीयेसाठी लागवड करण्यात आलेली १ हेक्टर तूर अंदाजे १० क्विंटल, हरभरा पिकाचा २९ क्विंटल माल अंदाजे किंमत १ लाख ८८ हजार चोरुन नेला.
याप्रकरणी फिर्यादी शशिकांत लक्ष्मण बारबोले (वय 55 वर्षे, व्यवसाय- कृष्णी अधिकारी) यांनी दिनांक १२ जुलै रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 329(3)(4), 324(5),303(2), 3(5) सह 3 सार्वजनिक संपत्ती नुकसान अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्याकडून अधिक तपास करण्यात येत आहे.