• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, January 26, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पत्रकार केसकर यांच्यावरील हल्ल्यातील 2 आरोपीच्या मुसक्या आवळल्या,मुख्य आरोपी बडतर्फ पीएसआय

Aarambha Marathi by Aarambha Marathi
April 8, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
2k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

पोलिसांनी कॉल ट्रेस, सिसिटीव्ही फुटेजवरून ७ दिवसात लावला छडा

८ वर्षांपूर्वीच्या बातमीचा राग मनात धरून हल्ल्याचा प्रयत्न

आरंभ मराठी / धाराशिव

पत्रकार रवींद्र केसकर यांचे अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचा पोलिसांनी अवघ्या ७ दिवसात छडा लावला असून, पाचपैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.यातील मुख्य आरोपी हा बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार बनसोडे हा असून, त्याने मित्राच्या मदतीने हल्ल्याचा प्रयत्न केला. त्याने धाराशिव शहरातील शाहू नगर भागातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. त्याच्यावर पोस्कोसह गंभीर गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर त्याला १० वर्षाची शिक्षा लागली होती. जामीनवर बाहेर आल्यानंतर त्याने हा प्रकार केल्याचे समोर आले आहे.

१ एप्रिल रोजी रात्री पत्रकार केसकर घरी जाताना त्यांची गाडी अडवून त्यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला तसेच प्रतिकार केल्यानंतर मारहाण करून दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पत्रकार संघाच्या वतीने पोलीस प्रशासनासह मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना निवेदन देऊन आरोपीना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या धडाकेबाज मोहिमेनंतर पोलिसांनी अवघ्या सात दिवसात आरोपीचा शोध लावला असून, यातील प्रमुख आरोपी हा शहरातील शाहू नगर येथील प्रेम बनसोडे असून, त्याने चार मित्रांच्या मदतीने हा प्रकार केला.

काय आहे प्रकरण.?

प्रेमकुमार बनसोडे हा पोलीस उपनिरीक्षक असताना म्हणजे ८ वर्षापूर्वी त्याने

रिव्हॉल्वरचा धाक दाखवून ११ वीमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पोस्कोसह गंभीर गुन्हे दाखल झाले होते. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.प्रकारणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी धाराशिव येथे येऊन पोलीस प्रमुखांना तातडीने तपास करण्याच्या सूचना केल्या होत्या. याप्रकरणी जलदगती न्यायालयाने बनसोडे याला १० वर्षाची शिक्षा सुनावली होती.शिक्षा भोगत असताना काही दिवसांपूर्वी त्याला जामीन मिळाला होता. याप्रकरणात केसकर यांनी बातम्या केल्या होत्या. त्याचा राग बनसोडे याच्या मनात होता. त्यामुळे त्याने केसकर यांच्यावर पाळत ठेवली आणि त्यांना अडवून मारहाण केली तसेच अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिसिटीव्ही फुटेज, कॉल ट्रेस करून दोन आरोपीचा शोध घेतला. दत्तात्रय भरत नरसिंगे (रा. तांदुळजा, ता.लातूर ) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्याने बडतर्फ प्रेमकुमार बनसोडे याच्या नियोजनानुसार केल्याचे सांगितले. त्यानंतर शिराढोण पोलिसाच्या मदतीने प्रेम बनसोडे याला कळंब तालुक्यातील जायफळ येथून अटक करण्यात आली आहे. यातील अन्य तीन आरोपीना लवकरच अटक करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले. पोलिसांनी तातडीने शोध घेऊन आरोपीना अटक केल्याबद्दल धाराशिव जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने पोलीस प्रशासनाचे आभार मानण्यात आले.

काय होता उद्देश..?

पत्रकार केसकर यांचे अपहरण करून त्यांच्याकडून बलात्कार प्रकरणातील मुलीची माहिती घेण्याचा उद्देश होता, असे आरोपीनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर संबंधित मुलीपर्यंत पोहोचण्याचा आरोपीचा उद्देश होता.

SendShareTweet
Previous Post

सुरेश बिराजदार यांचे शब्द ऐकूण कार्यकर्ते म्हणाले.. दाजी तुम्ही जिंकलात..!

Next Post

वधुपित्याचा संकल्प; मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेसोबत एक हजार केशर आंब्याच्या झाडांचे वाटप

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

वधुपित्याचा संकल्प; मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेसोबत एक हजार केशर आंब्याच्या झाडांचे वाटप

Osmanabad loksabha election अर्चनाताई पाटील शुक्रवारी भरणार उमेदवारी अर्ज, दोन्ही उपमुख्यमंत्री येणार..? थोड्याच वेळात जोरदार शक्तिप्रदर्शन करून ओमराजे भरणार उमेदवारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

धाराशिव तालुक्यात बंडखोरी वाढण्याची शक्यता, दुसऱ्या दिवशी ‘या’ उमेदवारांनी घेतली माघार

January 24, 2026

धाराशिव नगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडी बिनविरोध; ‘हे’ सदस्य झाले विषय समित्यांचे अध्यक्ष

January 24, 2026

आता ग्रामपंचायतीवर प्रशासकराज; ४२८ ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची प्रक्रिया सुरू

January 24, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group