आरंभ मराठी : धाराशिव
मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. राजकीय, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील व्यक्ती आंदोलनाच्या पाठीशी उभ्या राहत असताना, ओबीसी समाजातून मात्र आरक्षणाबाबत काही नाराजी व्यक्त होत आहे. ओबीसी आरक्षणावर गदा आणून मराठ्यांना आरक्षण दिले जाऊ नये, असा सूर या वर्गातून निघत आहे.
याच पार्श्वभूमीवर धाराशिव तालुक्यातील चिखली ग्रामपंचायतीच्या ओबीसी सरपंच वृंदावनी श्याम जाधवर यांनी मोठा निर्णय घेत जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहेत.त्यांच्या मागण्या योग्य असून, सरकारने तातडीने तोडगा काढला नाही तर उद्भवणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल.त्यांची प्रकृती खालावत असून,सरकारने याची तातडीने दखल घ्यावी.
ओबीसी असूनही सामाजिक भावनेतून घेतलेला सरपंचांचा हा निर्णय आंदोलनाला व्यापकता मिळवून देणारा ठरत आहे. त्यांच्या या मागणीने समाजात तेढ निर्माण झाल्याचे निर्माण केले जाणारे चित्र संशयास्पद असल्याचे स्पष्ट होत आहे.