प्रतिनिधी / धाराशिव
उस्मानाबाद क्रेडाईचा पद्ग्रहण समारंभ शुक्रवारी शहरातील हॉटेल apple मध्ये पार पडला. अध्यक्ष म्हणून संजय देशमाने यांनी तर उपाध्यक्ष म्हणून प्रदीप मुंडे,सचिव पंकज बाराते यांनी पद ग्रहण केले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
उस्मानाबाद क्रेडाईच्या 2023 ते 25 चा पदग्रहण संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी होते. सोहळ्यासाठी क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील फुरडे, राष्ट्रीय पदाधिकारी शशिकांत जिद्दीमनी , डॉ.धर्मवीर भारती, अशिष पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी 2021-23 चे अध्यक्ष रणजीत रणदिवे यांनी मागील दोन वर्षाचा अहवाल सादर केला. क्रेडाईचे उपाध्यक्ष प्रदीप मुंडे यांनी मान्यवरांचे स्वागत केले, क्रेडईचे 2023 -25 चे अध्यक्ष म्हणून संजय देशमाने उपाध्यक्षपदी प्रदीप मुंडे, सचिव पंकज बाराते, सहसचिव ऋषिकेश धाराशिवकर यांनी कोषाध्यक्ष प्रदीप खामकर, राजन पाटील, विश्वजीत देशमुख. प्रदीप खामकर, युवा समन्वयक शिवाजी पोळ तर सौ किरण देशमाने यांनी महिला समन्वयक म्हणून पदभार स्वीकारला.
एसपी म्हणाले, इमारत तिथं झाडे लावा
यावेळी एसपी अतुल कुलकर्णी यांनी ग्रीन बिल्डिंग म्हणजे हरीत इमारतीचे महत्व सांगितले व कुठलेही बांधकाम करत असताना तेथे जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजेत असे आवाहन केले. क्रेडाईचे नुतन अध्यक्ष संजय देशमाने यांनी रियल इस्टेटमध्ये काम करत असताना येणाऱ्या विविध अडचणीबद्दल माहिती दिली तसेच शहर सुशोभीकरणासाठी संकल्पना मांडल्या. क्रेडाईचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुनील फुरडे यांनी रियल इस्टेटमधे काम करत असताना नितीमत्ता खूप महत्त्वाची आहे,याबद्दल सर्वांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी क्रेडाई महाराष्ट्राचे सहसचिव डॉ. धर्मवीर भारती तसेच क्रेडाई राष्ट्रीय पदाधिकारी चाप्टर अँड मेंबरशिप एक्सपान्शन कमिटी शशिकांत जिद्दीमनी यांनीही आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी शहरातील विविध बांधकाम व्यवसायिक व रियल इस्टेट मध्ये काम करणारे शहरातील बांधकाम व्यावसायिक , इंजिनिअर असोसिएशनचे अभियंते, व के्डाईचे सव सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मैंदर्गी यांनी केले व आभार प्रदर्शन पंकज बाराते यांनी केले.