नागपूरच्या सभेला उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष ऍड. धीरज पाटील यांचे आवाहन
प्रतिनिधी / धाराशिव
अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त काँग्रेसचे राष्ट्रीय महासंमेलन (सभा) नागपूर येथे आयोजित करण्यात आले असून,या सभेत आगामी लोकसभा निवडणुकीसाठीची दिशा आणि भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. सभेला जिल्ह्यातील सगळ्या विभागाच्या पदाधिकाऱ्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड धीरज पाटील यांनी केले आहे.
या महासंमेलनाच्या यशस्वीतेसाठी धाराशिव जिल्हा काँग्रेसची नियोजन बैठक जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत पाटील म्हणाले, नागपूर येथील सभा ही ऐतिहासिक होणार असून, आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. यासाठी प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे. जिल्ह्यातील सभेसाठी येऊ इच्छिणाऱ्यांनी तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांचेकडे नाव नोंदणी करावी व काही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, युवक काँग्रेसचे राज्य सरचिटणीस अभिजित चव्हाण, वरीष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील, उपाध्यक्ष डॉ.स्मिता शहापुरकर, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, सरचिटणीस भागवतराव धस यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, लक्ष्मण सरडे, जिल्हा सचिव अशोक बनसोडे, सरफराज काझी, धाराशिव तालुकाध्यक्ष रोहित पडवळ, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, परांडा तालुकाध्यक्ष हनुमंत वाघमोडे, लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील, दीपक मुळे, बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, महिला जिल्हाध्यक्ष संगिता कडगंजे, प्रदेश सरचिटणीस शिलाताई उंबरे, युवक जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष आयुब पठाण, मानवाधिकार विभागाचे प्रभाकर लोंढे, स्वयंरोजगार विभागाचे अहमद चाऊस, सांस्कृतिक विभागाचे प्रेम सपकाळ, सुरेंद्र पाटील, मिलिंद गोवर्धन, सोशल मीडिया प्रमुख बालाजी बिदे, श्रीनिवास पाटील, सुरेखा जगदाळे, अभिषेक गुजर, संजय गजधने, सलमान शेख, अंकुश पेठे, अभिजित देडे, अजय खरसडे, अभिमान पेठे, संतोष पेठे, मेहराज शेख, महादेव पेठे, भारत काटे, सुभाष हिंगमीरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.