• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, April 6, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

लोहटा पश्चिम शिवारात गुप्त अफू शेतीचा पर्दाफाश; साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त

Aarambha Marathi by Aarambha Marathi
February 18, 2026
in Arambh Marathi
0
0
SHARES
1.6k
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / शिराढोण

धाराशिव जिल्ह्यातील अवैध अफू लागवडीवर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केली असून, दररोज वेगवेगळ्या तालुक्यात धाडी टाकून लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जात आहे. कळंब तालुक्यातील शिराढोण पोलीस ठाणे हद्दीतील लोहटा पश्चिम शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर अफू शेतीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या प्रकरणात तब्बल ५० किलो ११ ग्रॅम अफूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या मुद्देमालाची अंदाजे किंमत ७ लाख ५१ हजार ६५० रुपये इतकी असून, पोलिसांनी या प्रकरणी तिघा आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास लोहटा पश्चिम शिवारातील गट क्रमांक १७५, २३६ आणि २२७ येथील शेतांवर पोलिसांनी छापा टाकला.

या छाप्यात शेतांमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी न घेता आर्थिक फायद्यासाठी प्रतिबंधित अफू पिकाची लागवड करून त्याची जोपासना करण्यात येत असल्याचे उघड झाले. कारवाईदरम्यान पोलिसांनी अफूची बोंडे, फुले आणि पाने यांसह एकूण ५० किलो ११ ग्रॅम वजनाचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोलीस ठाणे शिराढोण येथे गुन्हा क्रमांक ३३/२०२६ अन्वये कलम ८(C), १८ एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अशोक ज्ञानोबा अडसूळ (वय ४६), नरसिंग अच्युत अडसूळ (वय ५५) आणि निलेश शिवाजी पवार (वय ३४), सर्व रा. लोहटा पश्चिम (ता. कळंब) यांना दिनांक १८ फेब्रुवारी रोजी पहाटे अटक करण्यात आली.

या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक धरणीधर बाबा कोळेकर यांनी फिर्याद दिली आहे. ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक शफकात अमना तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सपोनि धरणीधर कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल कबिरदास गायकवाड, परमेश्वर मेंगले तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. छाप्यावेळी राजपत्रित अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक ए.टी. चिंतले व मंडळ अधिकारी नरेशकुमार सुतार उपस्थित होते. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर पवार करत आहेत.

दरम्यान, जिल्ह्यात बेकायदेशीर अमली पदार्थांच्या लागवडीविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, गुप्त माहितीच्या आधारे विविध भागांत सातत्याने कारवाया सुरू आहेत. अशा प्रकारच्या बेकायदेशीर शेतीवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#Clandestine#cultivation#exposed#lakhs#seized#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजणार;  २० फेब्रुवारीपासून प्रभाग रचनेला प्रारंभ

Next Post

काम न करता सात लाखांचा अपहार; बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

Related Posts

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशिव क्रिकेट संघाचा नांदेड संघावर दमदार विजय

April 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध; राज्याच्या खो-खो संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

April 5, 2026

बातमी हटवण्यासाठी पत्रकाराला धमकी; पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल

April 5, 2026

2020 च्या पीक विमा प्रकरणात लोकप्रतिनिधी गप्प का? 134 कोटी रुपये कोणी अडवले?

April 5, 2026

तुळजापूर शहरात अनधिकृत बॅनरचा सुळसुळाट; शहराचे विद्रूपीकरण, अपघाताचा धोका वाढला

April 4, 2026

येरमाळा येडेश्वरी यात्रेत मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या

April 4, 2026
Next Post

काम न करता सात लाखांचा अपहार; बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांवर गुन्हा दाखल

धक्कादायक! सावत्र मुलाकडूनच आईवर लैंगीक अत्याचार; साथीदारासह मारहाण

ताज्या घडामोडी

विभागीय महसूल क्रीडा स्पर्धेत धाराशिव क्रिकेट संघाचा नांदेड संघावर दमदार विजय

April 5, 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध; राज्याच्या खो-खो संघटनेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अध्यक्ष

April 5, 2026

बातमी हटवण्यासाठी पत्रकाराला धमकी; पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दोघांवर गुन्हा दाखल

April 5, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group