सामजिक ऐक्याचा संदेश, सार्वजनिक शिवजयंती उत्सव कमिटीचा अनुकरणीय उपक्रम
विक्रांत उंदरे / आरंभ मराठी
वाशी :- छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातीतील बारा बलुतेदार मावळ्यांना सोबत घेऊन सामाजिक एकता जपुन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. महाराज कोणा एका जाती धर्माचे नव्हते तर ते अखंड हिंदुस्थानचे राजे आणि कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक होते. त्यामुळे त्यांना प्रत्येक जाती आदराचे स्थान आहे.त्यामुळे त्यांच्या जन्मोत्सव सोहळ्यात सर्वत्र सर्व समाजाचा पुढाकार असतो. वाशीमध्ये मध्यवर्ती सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळीही सामाजिक ऐक्य जपत सर्वांच्या उपस्थितीत उत्सव साजरा केला.
१६७४ साली राज्याभिषेकानंतर हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे ३५० वे वर्ष सुरू असून त्यानिमित्ताने शिवजयंती उत्सव कमिटीने शहरातील सर्व जाती धर्मातील प्रतिनिधींना आमंत्रित करून शिवजयंतीदिनी शिवमूर्तीचे पूजन करण्याचा सन्मान दिला.
या विशेष उपक्रमातून समाजात सामाजिक एकता आणि समतेचा संदेश देत उत्सव कमिटीने नेहमीप्रमाणेच वेगळेपण जपले. त्यामुळे सर्व समाज घटकातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
परकीय आक्रमनांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळण्यासाठी सर्व जाती, वर्ण, पंथ, धर्म यांमधील भेदभाव नष्ट करूनच राष्ट्र निर्माण होऊ शकते, या विचारातून सामाजिक एकता जपत शिवरायांनी हिंदवी स्वराज्य निर्माण केले. छत्रपतीच्या याच विचारांची प्रेरणा घेऊन सार्वजनिक शिवजयंती महोत्सवात शहरातील अठरा पगड जाती, बारा बलुतेदार प्रतिनिधींना उत्सवात सहभागी करून घेत शिवरायांच्या पूजनाचा मान देऊन या मध्यमातून वाशीकरानी सामाजिक समरसता साधली. यावेळी सर्व प्रतिनिधींच्या मनात समाधानाची भावना आणि चेहऱ्यावर आनंद दिसत होता. उत्सव कमिटीचा हा उपक्रम अनुकरणीय असून सर्वच ठिकाणी सामाजिक एकोपा जपुन कार्यक्रम आयोजित करण्याची भावना उपस्थितांमध्ये होती.
यावेळी उपनगराध्यक्ष सुरेश कवडे, शिवसेना नेते प्रशांत चेडे, गटनेते नागनाथ नाईकवाडी, नगरसेवक शिवहर स्वामी, संतोष गायकवाड, कृष्णा गवारे, नितीन चेडे, विकास मोळवणे, सुमित अहिरे, प्रशांत गायकवाड, पोलिस निरीक्षक रवींद्र शिंदे, डॉ. दयानंद कवडे, डॉ. प्रमोद शिंदे, हरून काझी, संतोष पवार, दादासाहेब चेदे, अभिजित जगताप, प्रशांत कवडे यांच्यासह सर्वपक्षीय नेते , सामाजिक कार्यकर्ते व शहरातील विविध समजघट कातील नागरिक , तरुण उपस्थित होते.
सामाजिक समारसतेचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी उत्सव कमिटीचे संदीप हुंबे, बाळासाहेब कवडे, सूर्यकांत मोळवणे, सचिन गवारे, प्रेम मोळवणे, ऋषी गपाट यांच्यासह कमिटीचे सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक शिवजयंती उत्सव कमिटीच्या वतीने डिजिटल नामफलक बसविण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत या डिजिटल बोर्डाचे अनावरण करण्यात आले.