प्रतिनिधी / चाकूर
13 वर्षापूर्वी सुरू झालेल्या बुलडाणा अर्बन बँकेच्या चाकूर शाखेची व्याप्ती वाढली असून,नवीन संकल्पना, नवीन धोरणे, नवीन व्यवसायाच्या उमेदीने चाकूरच्या मार्केटमध्ये शाखेचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या शाखेचा 13 वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
बुलडाणा अर्बन बँक विशेष कार्यासाठी व विशेष कारणासाठी प्रचलित आहे ती म्हणजे सोने तारण. कोणत्याही खातेदाराना अवघ्या 5 मिनिटात सोने तारण कर्जाची फाईल मंजूर करून दिली जाते. तत्काळ कर्ज उपलब्ध करून देणारी मार्केटमधील ही एकमेव बँक आहे. बुलडाणा अर्बन चाकूर या शाखेत विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्था असे सध्या 5 हजार 500 एवढे खातेदार असून, शाखेत आजतागायत 16 कोटीचे सोने तारण कर्ज चाकूर शहर व खेड्यापाड्यातील सर्वसाधारण शेतकरी व मजुर वर्गाला वाटप करण्यात आले आहे व तसेच 29 कोटींच्या ठेवी (FD) खातेदारांनी बँकेवर विश्वास ठेवून जमा केलेल्या आहेत. चाकूरवासियांच्या प्रेमाचा व सहकार्याचा सन्मान ठेवून इमानदारीने कार्य करत राहणार हा विश्वास शाखेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवला व असेच सहकार्य पुढील काळात असू द्यावे, असे आवाहन कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले. वर्धापन दिनानिमित्त सर्व ठेवीदार, सभासद, कर्जदार व हितचिंतकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा विभागीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर देशमाने, व श्री.वाघ साहेब व तसेच शाखाव्यवस्थापक रघुनाथ हांगे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक ज्ञानेश्वर नागराळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी दिल्या. तीर्थप्रसाद व अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता केली.
बुलडाणा अर्बन चाकूर शाखेने अडीअडचणींना खूप सहकार्य होते व लवकरात लवकर कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यामुळे आमचे काम सोपे होते,अशी प्रतिक्रिया सभासद व कर्जदारांनी दिली.