प्रतिनिधी / धाराशिव
जिल्हा शासकीय रुग्णालयात रक्ताची कमतरता भासत असल्याने रक्तदान शिबिरातून रक्तदाते रक्तदान करतात. रक्तदान काळाची गरज आहे.रक्तदान केलेल्या रक्तदात्यांचा सन्मान झाला पाहिजे, यासाठी रुग्ण कल्याण समितीच्या रक्तदान उपक्रमात रक्तदात्यांना ट्राॅफी व रक्तदान केल्याचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
रक्तदात्यांचा सन्मान व्हावा, यासाठी रविवारी एफ. वाय. सेल्सच्या सौजन्याने ३० ट्राॅफी रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून वैद्यकीय महाविद्यालयाला सुपूर्द करण्यात आल्या. दिल्याबद्दल सेल्सचे आभार मानून रुग्ण कल्याण समितीने राबविलेल्या उपक्रमातुन रक्तदात्याचा सन्मान ट्राॅफी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा डोमकुंडवार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या.रुग्ण कल्याण समिती सातत्याने रुग्णालयाच्या हितासाठी काम करत आहे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ.शिल्पा डोमकुंडवार यांना ट्राॅफीचा संच देतांना रुग्ण कल्याण समिती सदस्य अब्दुल लतिफ,गणेश रानबा वाघमारे,शेख रौफ ब्रदर तसेच पॅथालाॅजीस्ट विवेक कोळगे,आकाश राऊत व रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.