प्रतिनिधी / धाराशिव
तालुक्यातील बार्शी ते कौडगाव रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, वाहतूक करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त आहेत. खड्डयामुळे रस्त्यावर अपघातात वाढ झाली आहे.
धाराशिव -बार्शी रस्त्यावरील कौडगाव ते जिल्हा हद्द दरम्यान रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मागील महिन्यात या रोडवरील खड्ड्यामध्ये मुरूम भरून रस्त्याची डागडुजी करण्यात आली होती. मात्र त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. खड्यामधील मुरूम निघून पडला आहे.यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे वाहनधारकांना अक्षरश: जीव मुठीत धरून वाहतूक करावी लागत आहे. संबंधित रस्त्याच्या प्रश्नाकडे बांधकाम विभागाचे मात्र सपशेल दुर्लक्ष असल्याचे दिसून येते.
सोलापूर हद्दीपर्यंत रस्ता पूर्ण झाला आहे .धाराशिव जिल्हा हद्द म्हणजेच कौडगाव (तांडा) ते धाराशिव या रस्त्याचे नव्याने नुतनीकरण लवकरात लवकर करून अपघाताच्या घटना टाळाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. बांधकाम विभाग मात्र या मागणीकडे डोळेझाक करत आहे.