कपील माने | मंगरुळ ता कळंब
आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी पंढरपूर येथे पायी दिंडीत सहभागी होवून चालत जातात याच पार्श्वभूमी वर मंगरूळ येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने विद्यार्थांनी मंगरूळ गावात एक अनोखा उपक्रम राबविला.
विद्यार्थ्यांनी चालत संपूर्ण गावात वारीचा आनंद घेतला चिमुकल्यांच्या हरी नामाचा जयघोषाने संपूर्ण गाव दुमदुमुन निघाले होते. विद्यार्थ्यांनी हातात भगवे ध्वज घेवून पायी दिंडीचा सोहळा गावात पार पाडला यावेळी विद्यार्थांनी विठ्ठल रुखमाई चे पोशाख परिधान करून गावतच पंढरीचे भक्तिमय वातावरन निर्मान केले होते. यावेळी शाळेच्या सर्व शिक्षक तसेच मुख्याध्यापक यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले यावेळी गावकऱ्यांनी ही या विद्यार्थ्यांच्या पायी दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून त्याचा आनंद घेतला अनेकांनी फुगडी खेळत हरिनामाचा जयघोष करीत विद्यार्थ्यांना प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या पायी दिंडी सोहळ्याचे गावातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.