प्रतिनिधी/धाराशिव
कळंब तालुक्यातील माळकरंजा येथील एका व्यक्तीला गाडीत घालून नेऊन त्याचा खून करण्यात आला. यातील आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी कळंब तालुक्यातील येरमाळा रोडवर आंदोरा येथे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.त्यामुळे राज्य मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार महादेव हिरा काळे याला माळकरंजा येथून चार चाकी गाडीतून उचलुन नेऊन ठार मारण्यात आले.
याप्रकरणी नागरिकांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, या प्रकरणातील आरोपी बब्रु काळे, सुरेश राजेंद्र पवार, गंगाराम बापू पवार, बबलू राजेंद्र पवार बप्पा रामराजे पवार रवी काळे यांचा मुलगा व इतर तीन जणांनी मिळून महादेव हिरा काळे यांना चार चाकी गाडीतून नेऊन ठार मारले. सर्व आरोपींवर त्वरित कारवाई न केल्यास आत्मदहन करू असा इशारा नागरिकांनी दिला आहे. आरोपींपासून मृताच्या कुटुंबीयांच्या जीवास धोका असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.