Ajit Pawar: शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा थेट सवाल विचारत अप्रत्यक्षरित्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना विचारला आहे.
आमची बोलणी भाजपशी सुरू होती तो पर्यंत शिंदे साहेबांचा शपथ विधी झाला नहव्ता, मला लोकांसमोर विलन का केल जातं कळत नाही, माझी काय चूक आहे आजही माझ दैवत पवार साहेब आहेत. एखादा माणूस सरकारी नोकरी लागली तर 58 व्या वर्षी रिटायर्ड होतो, वय जास्त झालं तर तुम्ही कधी थांबणार आहात की नाही असा प्रश्न अजित पवारांनी शरद पवारांना विचारला आहे.
लोकांच्या हितासाठी आमचा निर्णय- अजित पवार
अजित पवार यांच्या मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना संबोधीत करत आहेत. शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहे असे ते म्हणाले. माझ्यावर लहानपणापासूनच साहेबांचे संस्कार झाले असल्याचेही अजित पवार म्हणाले. सत्तेसाठी नाही तर लोकांच्या हितासाठी असा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले
मीही सभा घेऊन उत्तर देणार- अजित पवार
जर शरद पवार यांनी दौरे घेऊन सभा घेतल्या तर मला पण तिकडे सभा घेऊन उत्तर द्यावं लागेल. ही वेळ येऊ देऊ नये आता आराम करावा, घरातच दुरावा नको यायला असे अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार बोलतांना म्हणाले की, पवार साहेबांच्या छत्रछायेखाली मी घडलो आहे. 1977 ला देशपातळीवर निवडून आलेला जनसंघ पक्ष आता कुठंय? शोधावा लागतोय. देशाला सक्षम नेतृत्वाची गरज असते ती आज मोदींच्या नेतृत्वात पूर्ण होत आहे. पंचविशीपासून पंच्याहत्तीपर्यंत आपण योग्य काम करु शकतो, अंगात बळ असते, जिद्द असते. नंतर मात्र क्षमता कमी होतात.