• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, May 19, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

संकटाची छाया गडद; आर्थिक व्यवहार मंदावले, पावसाअभावी जिल्ह्यातील बाजारपेठेत शुकशुकाट, पाऊस न झाल्यास बैलपोळ्यावरही सावट

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 29, 2023
in अर्थचक्र
0
0
SHARES
375
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

अमोलसिंह चंदेल / धाराशिव

पावसाने ओढ दिल्यामुळे दिवसेंदिवस दुष्काळी छाया गडद होताना दिसत आहे. पावसाळा केवळ एक महिना उरला असून, तीन महिन्यात एकही मोठा पाऊस न झाल्याने बाजारपेठेत आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्ह्यातील बाजारपेठ विशेषतःशेतीवर अवलंबून आहे. यावर्षीचा खरीप हंगाम धोक्यात आल्याने बाजारपेठेत नैराश्याचे मळभ दाटून आले आहेत. शहरासह ग्रामीण भागातील बाजारपेठेत त्यामुळे शुकशुकाट जाणवत आहे.दरम्यान, परिस्थिती अशीच राहिल्यास यावर्षीच्या बैल पोळ्यावरही सावट दिसून येण्याची शक्यता आहे.

पावसाला उशिरा सुरुवात झाली तरी मोठ्या आशेने शेतक-यांनी खरीप पेरणी उरकली होती.त्यानंतर मात्र पुरेशा प्रमाणात पाऊस न झाल्याने खरीप हंगाम वाया जाण्याच्या स्थितीत आहे. तर शेतकरी डोळयात प्राण आणून पावसाची प्रतिक्षा करत आहेत. परंतू पावसाअभावी हे पीक करपून गेले व पुन्हा दुष्काळी दुष्टचक्र निर्माण होत आहे. निर्माण झालेल्या परिस्थितीचा बाजारपेठेवर परिणाम होवून कृषीविषयक तसेच इतर दैनंदिन साहित्याची बाजारपेठेतील आर्थिक उलाढालही मंदावली आहे.काही दिवसात पाऊस न झाल्यास बळीराजाचा महत्वाचा सण बैलपोळा देखील संकटाच्या सावटात सापडेल, अशी परिस्थिती आहे.

..तर गंभीर परिस्थितीचा सामना

पावसाची परिस्थिती कायम राहिल्यास येणा-या काळात अत्यंत गंभीर स्वरुपाचा संकटाचा सामना करावा लागणार आहे, अशी स्थिती आहे.पावसाच्या दडीमुळे शेतीसाठी लागणारा साहित्याचा पुरवठा करणा-या तसेच इतर म्हणजेच कपडा, किराणा आदी बाजारपेठेवरही विपरित परिणाम झाला असून याव्दारे होणारी उलाढाल प्रचंड मंदावली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे फवारणी, खत या साहित्यासाठी आर्थिक गुंतवणूक करण्यास शेतकरी धजावेनासा झाला आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी केंदावरील शेतक-यांकडून खरेदी विक्री मंदावली असून एकूणच त्याची झळ कृषी सेवा केंद्र तसेच इतर व्यवसायिकांना बसत आहे. निसर्गाचा फटका बसल्याने संभाव्य संकटाने बळीराजाची झोप उडाली आहे. सध्या शेतकऱ्यांना पावसाचा तर व्यापा-यांना ग्राहकांचा आधार मिळणे आवश्यक आहे. ग्राहकांचा ओघ कमी असल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसून येत आहे.

एकरी 15 हजार रुपयांचा जुगार

समाधानकारक पाऊस नसतानाही शेतक-यांनी निसर्गाच्या भरवशावर खरीप पेरणी केली. वास्तविक पाहता सोयाबीन पेरणीसाठी एकरी किमान 15 हजार रुपये खर्च येतो. हा खर्च यावर्षी जुगार ठरला आहे. त्यात शेतकरी हरला असून,हा खर्चही पदरात पडण्याची शक्यता दिसत नाही. नांगरणी 2 हजार 500, पाळी 1000 रुपये, पेरणी 900 रुपये, खत 1 हजार 300 रुपये, बियाणे 3 हजार रुपये, खुरापणी 5 हजार, फवारणी 2 हजार रुपये असा एकूण खर्च येतो.

उलाढाल ठप्प,रब्बीही संकटात

जवळपास दोन महिन्यापासून पाऊस नसल्याने शेतकरी कोणत्याही शेतीपुरक साहित्य खरेदीसाठी धजावत नाहीत. त्यामुळे यावर्षी खरीपाची विदारक परिस्थिती झाली असून येणा-या काळातही परिस्थिती भीषण होईल अशी चिन्हे आहेत. सध्या दुकानात एकही शेतकरी साहित्य खरेदीसाठी येत नाही तसेच रब्बी हंगामातही पेरणी होईल अशी आशा वाटत नाही.

प्रसन्न कस्तुरकर , कृषी सेवा केंद्र चालक, शिराढोण


कपड्यांना मागणी नाही
बाजारपेठेत निर्माण झालेल्या परिस्थितीचा साहजिकच कपड्याच्या विक्रीवरही परिणाम झाला आहे. कपडे खरेदी ही ग्राहकांसाठी निकडीची बाब नाही. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत कपड्याची खरेदी तर मागे पडली आहे.
– रामेश्वर मुंदडा, कापड व्यापारी, शिराढोण.

SendShareTweet
Previous Post

देवदर्शनासाठी कर्नाटकात गेलेल्या भाविकांच्या रिक्षाला ट्रकची धडक; अपघातात उमरग्यातील तीन, तुळजापुरातील एकजण ठार

Next Post

पोलिसांना आव्हान;चोरट्यांनी भर चौकातील एटीएम मशीन केली गायब, श्वान पथकही फेल

Related Posts

श्री.सिध्दीविनायक मल्टीस्टेटला पावणेचार कोटींचा नफा, सभासदांना मिळणार 10 टक्के लाभांश; संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांची घोषणा

August 17, 2024

साई नागरी सहकारी पतसंस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

January 5, 2024

दामदुपटीने रक्कम देण्याच्या आमिषाने फसवणूक टाळण्यासाठी आता प्रत्येक पोलिस ठाण्यात आर्थिक गुन्हे शाखेची व्याप्ती वाढवणार

December 8, 2023

दिशा पतसंस्था सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक; वार्षिक सर्वसाधारण सभेत ऍड. व्यंकट गुंड यांचे प्रतिपादन

August 27, 2023

शासकीय पातळीवर कामासाठी विलंब; बांधकाम व्यवसायिकांच्या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांना क्रीडाईचे निवेदन

July 28, 2023

दिशा नागरी पतसंस्थेच्या कळंब शाखेचा शुभारंभ; चेअरमन डॉ.दापके-देशमुख म्हणाले, ग्राहकांना अत्याधुनिक बँकिंग सेवा-सुविधा देणार

July 10, 2023
Next Post

पोलिसांना आव्हान;चोरट्यांनी भर चौकातील एटीएम मशीन केली गायब, श्वान पथकही फेल

अभूतपूर्व उत्साहात साजरा होणार यंदाचा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन; अमृतमहोत्सवानिमित्त 26 जानेवारीपर्यंत संपूर्ण मराठवाड्यात सांस्कृतिक कार्यक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

तुळजापुरमध्ये ड्रग्ज नंतर मटक्याचा सुळसुळाट

May 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात वृत्तपत्र विक्रेत्यांचा बंद जिल्ह्यातील वृत्तपत्र वितरण ठप्प.

May 18, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी आणखी एक आरोपी ताब्यात; सेवन गटातील आबासाहेब पवार अटकेत

May 18, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group