विशेष प्रतिनिधी। मुंबई
आरंभ मराठी विशेष
राज्यात पुन्हा एकदा सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढले असून, सरासरी १११ टक्के सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यामुळे यंदाही सोयाबीनची उत्पादकता वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीन पाठोपाठ राज्यात कापसाचे क्षेत्र असून,सरासरीच्या ९६ टक्के कापसाची लागवड झाली आहे.आतापर्यंत ८५ टक्के खरिपाची पेरणी झाली आहे. यंदा बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू आहे तर काही भागात मात्र पावसाचा जोर अधिक असल्याने शेतीचे नुकसान सुरू आहे. आजपर्यंत राज्यात सरासरीच्या १०४ टक्के पाऊस झाला आहे.
१७८ तालुक्यात सरासरीच्या १०० टक्क्यांपेक्षा जास्त, १३० तालुक्यात ७५ ते १०० टक्के आणि ५८ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.राज्यात १२० लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच सरासरीच्या ८५ टक्के पेरणी झाली आहे. यवतमाळ, जळगाव, बीड, नांदेड, बुलढाणा येथे सर्वाधिक पेरणी झाली असून, सांगली, ठाणे, पुणे, सोलापूर, गडचिरोली येथे कमी पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीनची १११ टक्के आणि कापसाची ९६ टक्के झाली आहे.
जास्तीच्या पावसामुळे पेरणी वाया गेली किंवा दुबार पेरणीची वेळ आल्यास महाबीजने बियाणाचे संपूर्ण नियोजन केले आहे,अशी माहिती कृषी विभागाने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढवले तर शेतकऱ्यांना चिंता करण्याची गरज नाही, अशी स्थिती आहे. दरम्यान, प्रधानमंत्री पीक विमा योजनेत यावेळी शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. १२०.६८ लाख शेतकरी सहभागी झाले आहेत. मागील वर्षी खरीप हंगामात ९६.६२ लाख शेतकरी सहभागी झाले होते
राज्यात वाघ वाढले, संख्या ५०० वर
मुंबई-राज्यात २०१४ मध्ये वाघांची संख्या १९० होती, त्यामध्ये लक्षणीयरीत्या वाढ होऊन सध्या पाचशे इतकी झाली आहे. वाघांचे अन्यत्र स्थलांतर व्हावे, असे सर्वांना वाटू लागले असून,’ वाढत चालल्याने ‘वाघ घेता का वाघ’,अशी परिस्थिती असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनंटीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत दिली.
विधान परिषदेत ,महाराष्ट्र वन्य प्राण्यांमुळे झालेली हानी, इजा आणि हानी यांसाठी हानीभरपाई प्रदान करणे विधेयक- २०२३ आज संमत झाले तेव्हा वनमंत्री बोलत होते.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले ,पिंजर्यातही वाघ आणि बिबटे यांची संख्याही प्रचंड वाढली आहे, वन्य प्राण्यांमुळे दुचाकी वाहनांचे अपघात होत असतील, तर या विधेयकात समावेश केेलेला नाही. कारण त्यामध्ये अनेक अडचणी आहेत. शेतामध्ये रानडुक्कर आणि रोही मारण्यासाठी अनुमती घेता येते. शेतात रानडुक्कर दिसल्यास मारून टाकावे, अनुमतीची वाट पाहू नये. कुरण विकासासाठी आवश्यक निधी सदस्यांना उपलब्ध करून दिला जाईल. ८० कोटी रुपये बिभट सफारीसाठी जुन्नर येथे खर्च होणार आहे. टायगर कॉरिडरही विकसित करत आहोत. अरण्यातील हिंसक जनावरांमुळे शेतकर्यांच्या शेतीची प्रचंड हानी होते. शेतकर्यांची गाय, म्हैस, बैल या वन्यप्राण्यांनी मारल्यास, संबंधित शेतकर्याला ७० हजार रुपये साहाय्य दिले जाते,असे मुनगंटीवार यांनी सांगितले. चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, सचिन अहिर, अभिजीत वंजारी, सुरेश धस, सतेज पाटील आदी सदस्यांनी मते व्यक्त करून सूचना मांडल्या. पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर सदस्यांशी बैठक घेऊन याविषयी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.