आरंभ मराठी / धाराशिव
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि.२१) धाराशिव तालुक्यातील तहसील कार्यालय परिसरात अक्षरशः उमेदवारांची झुंबड उडाली. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १२ गटांसाठी व पंचायत समितीच्या २४ गणांसाठी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अधिकृत वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत असली, तरी प्रत्यक्षात रात्री उशिरापर्यंत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू होती. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार, त्यांचे समर्थक, पक्षाचे कार्यकर्ते व प्रतिनिधी तहसील कार्यालयात गर्दी करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
जिल्हा परिषदेसाठी अर्जांची स्थिती –
अखेरच्या दिवशी जिल्हा परिषदेसाठी १५३ उमेदवारांनी २०१ उमेदवारी अर्ज दाखल केले. दिनांक १६ जानेवारीपासून २१ जानेवारीपर्यंतच्या कालावधीत धाराशिव तालुक्यातील १२ जिल्हा परिषद गटांसाठी एकूण २१४ उमेदवारांनी तब्बल २६८ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
गटनिहाय अर्जांची संख्या –
ढोकी गटातून १३ उमेदवारांनी १७ अर्ज, पळसप गटातून १४ उमेदवारांनी १७ अर्ज, कोंड गटातून ९ उमेदवारांनी ११ अर्ज, तेर गटातून ११ उमेदवारांनी १३ अर्ज, येडशी गटातून १८ उमेदवारांनी २५ अर्ज, आंबेजवळगा गटातून २० उमेदवारांनी २७ अर्ज, उपळा (मा.) गटातून २६ उमेदवारांनी ३२ अर्ज, सांजा गटातून १८ उमेदवारांनी २२ अर्ज, पाडोळी गटातून २७ उमेदवारांनी ३२ अर्ज, केशेगाव गटातून १५ उमेदवारांनी १६ अर्ज, बेंबळी गटातून ३१ उमेदवारांनी ४२ अर्ज, तर वडगाव सिद्धेश्वर गटातून १२ उमेदवारांनी १३ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पंचायत समितीसाठी अर्जांची स्थिती –
पंचायत समितीच्या २४ गणांसाठीही मोठ्या प्रमाणावर उमेदवारी अर्ज दाखल झाले. अखेरच्या दिवशी १९७ उमेदवारांनी २३५ अर्ज दाखल केले, तर १६ ते २१ जानेवारी या कालावधीत एकूण २४५ उमेदवारांनी २८७ उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.
गणनिहाय अर्जांची संख्या –
ढोकी १६ उमेदवार (१९ अर्ज), गोवर्धनवाडी १४ उमेदवार (१५ अर्ज), पळसप ५ उमेदवार (६ अर्ज), जागजी १२ उमेदवार (१२ अर्ज), कोंड १२ उमेदवार (१२ अर्ज), इर्ला ७ उमेदवार (७ अर्ज), तेर १२ उमेदवार (१२ अर्ज), आळणी ९ उमेदवार (११ अर्ज), येडशी ११ उमेदवार (१७ अर्ज), कसबे तडवळे १० उमेदवार (१२ अर्ज), आंबेजवळगा १४ उमेदवार (२० अर्ज), शिंगोली ७ उमेदवार (१० अर्ज), उपळा (मा.) १२ उमेदवार (१४ अर्ज), वाघोली ९ उमेदवार (९ अर्ज), सांजा ७ उमेदवार (८ अर्ज), चिखली ८ उमेदवार (१० अर्ज), पाडोळी ७ उमेदवार (१९ अर्ज), समुद्रवाणी ७ उमेदवार (८ अर्ज), केशेगाव ८ उमेदवार (९ अर्ज), करजखेडा ८ उमेदवार (१० अर्ज), बेंबळी ६ उमेदवार (६ अर्ज), रुईभर १३ उमेदवार (१३ अर्ज), वडगाव सिद्धेश्वर ९ उमेदवार (१५ अर्ज) आणि चिलवडी १० उमेदवारांनी १० अर्ज दाखल केले आहेत.









