• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, September 23, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

पीक विम्याचा 2021 चा निकाल शेतकऱ्यांच्या विरोधात ; 374 कोटी मिळण्याची आशा धूसर

Aarambha Marathi by Aarambha Marathi
September 18, 2025
in Arambh Marathi
0
0
SHARES
707
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

आरंभ मराठी / धाराशिव

खरीप 2021 च्या पीक विमा प्रकरणात उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर न्यायालयाने पीक विमा कंपनीच्या बाजूने निकाल दिला असून, शेतकऱ्यांच्या पदरी मात्र निराशा आली आहे. 374 कोटींची मागणी करणारा हा निकाल विरोधात लागल्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील सात लाख शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

या निकालाला लवकरच सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी सांगितले आहे.सध्या 2020 आणि 2021 अशा दोन वर्षातील दोन याचिकांची सुनावणी उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात सुरू आहे.

दोन्हीही यांचिकांवर सुनावणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, अंतिम निकालाची शेतकरी प्रतीक्षा करत होते. यामध्ये 2021 चा निकाल खंडपीठाने जाहीर केला असून, हा निकाल पीक विमा कंपनीच्या बाजूने लागला आहे. 2021 मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील सोयाबीनचे नुकसान झाले होते.

त्यावेळी कंपनीने अग्रीम विमा म्हणून 374 कोटी रुपयांचे वाटप केले होते. परंतु, कंपनीने आणखी 50 टक्के रक्कम म्हणजे आणखी 374 कोटींचे वाटप करावे अशी मागणी प्रशासनाने केली होती. त्याला विमा कंपनीने विरोध दर्शविला होता.

याविरोधात याचिका दाखल करून कंपनीला कोर्टात खेचले होते. मागील तीन वर्षांपासून यासंबंधीचा खटला सुरू होता. परंतु, अंतिम निकाल मात्र कंपनीच्या बाजूने लागला आहे. त्या संदर्भातील निकालाचे 90 पानाचे जजमेंट प्रसिद्ध करण्यात आले आहे.

उच्च न्यायालयाने दिलेल्या निकाल पत्रात पीक कापणी प्रयोगा आधारे जे उत्पादन आलेले आहे ते बरोबर असून त्यानुसारच रक्कम वितरित केली गेली असल्याचे कंपनीचे म्हणणे ग्राह्य धरले आहे. मात्र, पीक कापणी कालावधीमध्ये अर्थात क्रॉप कॅलेंडरनुसार दिल्या गेलेल्या पूर्व सूचनांना 100% रक्कम वितरित करणे आवश्यक असल्याचा केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेमधील 21.5 चा मुद्दा दुर्लक्षित केला गेला असल्याचे पीक विमा अभ्यासक अनिल जगताप यांचे म्हणणे आहे.

तसेच आरआरसी कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना केवळ 25 लाख रुपयापर्यंतचा अधिकार असल्याचे निरीक्षणही कोर्टाने नोंदवले आहे. यासंदर्भात आणखी ठोस पुरावे दिल्यास सुप्रीम कोर्टात निकाल शेतकऱ्यांच्या बाजूने लागू शकतो असा विश्वास अनिल जगताप यांनी व्यक्त केला.

या खटल्यात सरकारी वकीलांचा युक्तिवाद कुचकामी ठरला आहे. सरकारी वकिलांना मदत करण्यासाठी प्रति सुनावणी दोन लाख रुपये रक्कम देऊन लावलेले खाजगी वकील देखील शेतकऱ्यांची बाजू मांडण्यात कमी पडले. त्यामुळे निकाल शेतकऱ्यांच्या विरोधात लागला उच्च न्यायालयात 2020 च्या प्रकरणाची देखील सुनावणी पूर्ण झाली असून, त्याचा अंतिम निकाल येणे बाकी आहे.

त्यानुसार धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 235 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे. 2020 च्या प्रकरणात तरी शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. 2021 चा निकाल विरोधात गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना विमा कंपनीकडून मदत मिळणार नाही.

याप्रकरणी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका दाखल करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याप्रकरणी लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Tags: #cmDevendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #dharadhiv#osmanabad#cropinsurance#results#farmers#crores#trendingnews#trendingnow
SendShareTweet
Previous Post

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीची मोठी झळ; 400 कोटींच्या अनुदानाची गरज, 189 कोटींचा पहिला प्रस्ताव शासनाकडे सादर

Next Post

तुळजाभवानी मातेच्या दरबारात होणार ‘या’ नवदुर्गांचा सन्मान; नवरात्र उत्सवात नऊ दिवस कार्यक्रम

Related Posts

पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; जिल्ह्यातील शाळांना उद्या सुटी जाहीर

September 22, 2025

शारदीय नवरात्र उत्सवादरम्यान दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या

September 22, 2025

अभ्यासू पत्रकारितेचा अंत; ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक (नारीकर) यांचे निधन

September 19, 2025

दारूसाठी पैसे न दिल्याने अपहरण करून तरुणाचा खून; तिघांना जन्मठेप

September 18, 2025

तुळजाभवानी मातेच्या दरबारात होणार ‘या’ नवदुर्गांचा सन्मान; नवरात्र उत्सवात नऊ दिवस कार्यक्रम

September 18, 2025

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीची मोठी झळ; 400 कोटींच्या अनुदानाची गरज, 189 कोटींचा पहिला प्रस्ताव शासनाकडे सादर

September 18, 2025
Next Post

तुळजाभवानी मातेच्या दरबारात होणार 'या' नवदुर्गांचा सन्मान; नवरात्र उत्सवात नऊ दिवस कार्यक्रम

दारूसाठी पैसे न दिल्याने अपहरण करून तरुणाचा खून; तिघांना जन्मठेप

ताज्या घडामोडी

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

संकटाचा पाऊस: ना अंधाराची तमा, ना जीवाची पर्वा, रात्रभर चिखल तुडवत आमदार कैलास पाटील यांची जीव वाचविण्याची धडपड

September 23, 2025

पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; जिल्ह्यातील शाळांना उद्या सुटी जाहीर

September 22, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group