डॉ. दोमकुंडवार आता वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सह संचालक
आरंभ मराठी / धाराशिव
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.शिल्पा दोमकुंदवार यांची बदली झाली असून, त्यांच्या जागी अधिष्ठातापदी उदगीर येथील डॉ.शैलेंद्र चव्हाण यांची नियुक्ती झाली आहे. डॉ.चव्हाण उद्या म्हणजे मंगळवारी सकाळी अधिष्ठाता पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.यासंदर्भातील आदेश आजच निघाले आहेत.
10 फेब्रुवारी 2022 रोजी धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदी डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांची संदर्भाधीन शासन आदेश अन्वये सरळसेवेने नियुक्ती देण्यात आली होती.
आता प्रशासकीय कारणास्तव लातूर येथील विलासराव देशमुख डॉ. शैलेंद्र चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राध्यापक (बधिरीकरणशास्त्र) यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.तर डॉ.दोमकुंडवार यांची बदली वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सह संचालकपदी करण्यात आली आहे.
लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यारत असलेले डॉ. शैलेंद्र चव्हाण मूळचे उदगीरचे असून, त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण उदगीर येथील शामलाल विद्यालयात तर अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस, एमडीपर्यंतचे शिक्षण झाले आहे.
त्यांनी अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून 15 वर्षे सेवा केली, त्यानंतर 7 वर्षे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले आहे. धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातापदाची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर आली आहे.