• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, October 14, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

उद्या वेळा अमावस्या, लगबग सुरू, शेतात सजणार हिरवाईचा अपूर्व सोहळा, बाजारात भाज्यांची रेलचेल

Aarambha Marathi by Aarambha Marathi
January 10, 2024
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
461
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

लातूर, धाराशिव जिल्ह्यातील शेतीला समृध्द करणारी परंपरा

–युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

लातूर आणि धाराशिव जिल्हा आणि जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात उद्या गुरुवारी, 11 जानेवारी रोजी समुद्राला जशी, पाण्याची भरती येते, तशी शेताशेतात माणसाची, भरती येते.कोणत्याही पुराणात किंवा इतिहासात नसलेला मात्र शेकडो वर्षाची परंपरा असलेला सण म्हणजे येळवस म्हणजे वेळा आमावस्या…हा सण हिरवाईचा अपूर्व सोहळा…11 जानेवारी रोजी दोन्ही जिल्ह्यातील शेतात भरेल.त्यासाठी लगबग सुरू झाली आहे. भाज्यांची खरेदी सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर भाज्यांचे भाव देखील वाढले आहेत.वेळ अमावस्या नेमकी काय आहे, हे महाराष्ट्राला समजावे म्हणून हा लेख प्रपंच.

वेळाआमावस्या चार दिवस अगोदर साधनाची जमवा-जमव सुरु होते. त्यात तुरीच्या शेंगा, चवळी,भुईमूग हा सगळा रानमेवा जमा होतो…आणि वेळाआमावस्या पहाटे घराघरात चूल पेटते… बेसन पीठ कालवून चिंच आणि अंबवलेल्या ताकाच्या पाण्यात वर उल्लेखलेले उकडलेले पदार्थासह शिजवलेली भाजी… म्हणजे भज्जी… ही भज्जी म्हणजे अफलातून भाजी, मी आजपर्यंत राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरलो, वेगवेगळे पदार्थ खाले पण भज्जीसारखी अफलातून चव कशाला म्हणजे कशाला नाही …या डीशची तुलना कोणतेही पंचतारंकित हॉटेलही करु शकणार नाही…. या बरोबर दिले जाणारे अंबील म्हणजे तर राज दरबारी असलेले सगळे पेय फिके पडावेत असे…चार दिवसाचे ताक ज्वारीच्या पिठात अंबवून जिरा फोडणी दिलेल हे पेय जे तांब्यावर तांबे रिचवले तरी प्यायची इच्छा होते ते अंबिल. भल्या थोरल्या भाकरी,गव्हाची खीर एका शेतात २० ते २५ लोक जेवतील एवढा स्वयंपाक वाजत गाजत घरातून डोक्यावरुन शेतावर निघतो. एका शेतात खाल्लेली येळवस दुसऱ्या शेतात जाऊन खाण्यासाठी ते जिरावं म्हणून प्रत्येक कोपीच्या पुढे झोका बांधला जातो..

काय आहे परंपरा
अमावास्येला हा उत्सव साजरा केला जातो. रब्बी पेरणीनंतर येणाऱ्या सातव्या अमावास्येला हा उत्सव होतो.भारतीय संस्कृती ही प्रामुख्याने कृषी संस्कृती आहे. सर्व प्राणिमात्रांची मूलभूत गरज म्हणजे अन्न. त्यामुळे मानवी जीवनात अन्न-धान्याचे महत्त्व अविवाद्य असल्याने आपल्या पूर्वजांनी त्यासंबंधी विशेष विचार केलेला आढळून येतो.
भारतीय व्दिपकल्पात सिंधु संस्कृती पासून नदीचे जल पुजन करण्याची परंपरा चालत आलेली आहे. गंगा ,यमुना , गोदावरी , सरस्वती ,नर्मदा ,सिंधु आणि कावेरी या त्या सात नद्या ( सप्त सिंधु ) भारतीय लोक परंपरेत अतिशय पवित्र समजल्या जातात. त्यामागे त्यांच्या प्रती असलेली कृतज्ञता होती. त्याच सप्तसिंदु मातृका म्हणून पुजण्याची परंपरा सुरु झाली. पुढे पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्यानंतर त्यातले जल हे या सप्त सिंधुचे प्रतिक म्हणून पुजल्या जावू लागले. विहरीच्या जवळ प्रतिकात्मक सात दगड पुजण्याची परंपरा आहे तिला लातूर जिल्ह्यात आसरा म्हणून ओळखले जाते. आसरा म्हणजे तुच आमची राखण करणारी, सहारा देणारी ,पाणी पाजणारी. याच आसराची पुजा वेळा आमवस्येच्या दिवशी प्रत्येक शेतात मस्त ज्वारीच्या कडब्याच्या पेड्यांची कोप करुन मनोभावे पूजा करून लक्ष्मीला ब्लाऊज पीसने ओटी भरून नैवेद्य दाखवला जातो. परंपरा म्हणून खोपेला ५ फेऱ्या मारतात आणि “वलग्या वलग्या सालम पलग्या” असे म्हटले जाते. हे कन्नड वाक्य आहे. कन्नडात “वलगे वलगे सालम पलगे” असा उच्चार होतो. त्याचा अचूक अर्थ “वांग्याची भाजी आणि पोळी तुम्हाला(लक्ष्मीला) अर्पण करतो. तुम्ही आमच्यावर वर अनुग्रह करा.” असा होतो.
सकाळी पूजाकरुन आणि हा सगळा सुग्रास भोजनाचा भोज चढवून मोठी पंगत बसते….. जेवण करताना आपण किती खातोय याचे भान राहत नाही. प्रत्येकाच्या कोपीला जावून भज्जीचा अस्वाद घेण्याचा आग्रह होतो, तो टाळता येत नाही, पोटाला तडन लागते. जेवणाच्या पात्रावरुन उठून झोक्यावर जावून झोका खेळायचे खालेले अन्न पचवण्यासाठीचा प्रयत्न करायचा.. आणि पुन्हा दुसऱ्या कोपीवर जाऊन जेवायचे…एकेकाळी १२ बलुतेदार ,आठरा आलुतेदार यांनाही आग्रहाने जेवायला बोलवून हे सगळे मोठ्या सन्मानाने खावू घातलं जात. संध्याकाळी ज्वारीच्या पेंडीचा टेंबा करुन रब्बीचा गहू, हरभरा याच्या वावराला तो पेटवून रान ओवाळून काढायचे, आणि तोच टेंबा मिरवत जावून गावातील मंदिराच्या समोर टाकायचा मोठी आग करुन ती शमली की तीच्या राखेतून विस्तव असतानाच ती ठोकरुन घरी जायचे. असा मनमोहक सण आहे. त्यानंतर घरातले कर्ते पुरुष माळेगावच्या खंडोबाच्या जत्रेला निघून जायचे….. ही जत्रा देशभरात वेगवेगळ्या कारणासाठी प्रसिद्ध आहे. मोठा घोड्याचा बाजार ( माजी मुख्यमंत्री कै. विलासराव देशमुख यांच्यासह अनेकांचे दैवत ), गाढवांचा बाजार, सगळ्या भटक्या जमातींची पंचायत यावेळी इथे भरते. देशभरातले तृतीयपंथी दर्शनाला येतात (तृतीयपंथांचे माळेगाव अशीही ओळख ) ,तमाशाचे मोठ मोठे फड….. यामुळे या जत्रेला पुरुष मंडळीच्या दृष्टीने ख-या अर्थाने चांगभलं असे ….. असा हा सण आणि त्याची परंपरा आहे आजही मोठे हौसेनी सांभाळली जाते… चला तर मग येळवस साजरी करू या.. महान परंपरेचा वारसा जपू या.!

@युवराज पाटील
जिल्हा माहिती अधिकारी, लातूर

SendShareTweet
Previous Post

Good news गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील पिकविम्याचे प्रलंबित २९४ कोटी रुपये २५ जानेवारीपर्यंत मिळणार, बैठकीत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांची सहमती

Next Post

आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ राहिलोत का, पत्रकारांनी स्वतःला विचारून पहावे

Related Posts

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025

निधी स्थगितीबाबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही आमदार राणा पाटील यांच्याकडून प्रतिसाद नाही; पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली खंत, राणा पाटील यांनीच निधीबाबत तक्रार केल्याचाही उल्लेख

June 13, 2025

Dharashiv news महायुतीमध्ये वादाची ठिणगी; फडणवीसांना ‘बाप’ संबोधणाऱ्या राणेंना सद्बुद्धी यावी, शिवसेना जिल्हाप्रमुख साळुंके यांचा टोला

June 8, 2025

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आणखी एक आरोपी अटक, आतापर्यंत एकूण 37 आरोपी निष्पन्न

June 8, 2025
Next Post

आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ राहिलोत का, पत्रकारांनी स्वतःला विचारून पहावे

दिव्यांची आरास अन् फुलांच्या माळांनी सजला परिसर; गीत रामायण नृत्याविष्काराने धाराशिवकर भारावले, कार्यक्रमाला अलोट गर्दी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

लोकमंगल मल्टिस्टेटची रोकड आणि सोने लुटणाऱ्या आरोपीच्या दोन महिन्यांनी मुसक्या आवळल्या

October 14, 2025

धाराशिव बसस्थानकातील छत कोसळले; महामंडळाकडून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा इशारा

October 13, 2025

धाराशिव पंचायत समिती निवडणूक गण निहाय आरक्षण सोडत,बेंबळी,येडशी, समुद्रवाणी गण ठरविणार सभापती

October 13, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group