• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Monday, September 1, 2025
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अवकाळी पावसाचा तडाखा, महाराष्ट्रात अडीच लाख एकरावरील पिकांचे नुकसान, पंचनामे केलेले प्रस्ताव तातडीने सादर करा-मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Aarambha Marathi by Aarambha Marathi
November 28, 2023
in महाराष्ट्र
0
0
SHARES
387
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

प्रतिनिधी/ मुंबई

गेल्या दोन दिवसांत धाराशिवसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट, वादळी वारे सुरु असून त्यामुळे फळ बागा आणि रब्बी पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी सुरु झाल्यानंतर प्राथमिक अंदाज घेण्यात आला.त्यानुसार राज्यात ९९ हजार ३८१ हेक्टर म्हणजेच सुमारे अडीच लाख एकर क्षेत्रात नुकसान झाले आहे. या बाधित क्षेत्रातील पंचनामे प्रचलित कार्यपद्धती प्रमाणे तातडीने करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकारी यांनी सर्व क्षेत्रीय यंत्रणांना द्यावेत व  33 टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी निधी मागणीचा प्रस्ताव तत्काळ पाठवावेत, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे राज्यात नुकसान झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत धाराशिव जिल्ह्याचा समावेश नाही. कारण या जिल्ह्यात मंगळवारी सकाळी पाऊस झाला आहे.या नुकसानीची आकडेवारी बुधवारी समोर येऊ शकते.

राज्यातील काही जिल्ह्यांत सोमवारी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळपिकांच्या बाधित क्षेत्राबाबत मंगळवारी कृषी विभागाकडून माहिती घेण्यात आली. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड हे तालुके बाधित असून यातील ५३ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे., पालघर जिल्ह्यातील पालघर, वसई व डहाणू तालुक्यातील ४१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, नाशिक जिल्ह्यातील कळवण, नांदगाव, नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्वर, सटाणा, दिंडोरी, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सिन्नर, चांदवड, येवला तालुक्यातील  ३२ हजार ८३३ हेक्टर क्षेत्रातील कांदा, द्राक्ष, सोयाबीन, मका, गहू, ऊस व फळपिके, धुळे जिल्ह्यातील साक्री, शिरपूर, शिंदखेडा तालुक्यातील ४६ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, कापूस, हरभरा, नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर, अक्कलकुवा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्राणी तालुक्यातील २ हजार २३९ हेक्टर क्षेत्रातील भात, कापूस, तूर, मिरची, मका, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात कांद्याचे नुकसान

जळगाव जिल्ह्यातील जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, अमळनेर, चोपडा, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव, जामनेर, पाचोरा, धरणगा,बोदवड, भडगाव तालुक्यातील ५५२ हेक्टर क्षेत्रातील कांदा, हरभरा, गहू, मका, ज्वारी व फळपिकांचे नुकसान झाले. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, कोपरगाव, पारनेर, राहाता येथील १५ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रातील केळी, पपई, मक्याचे नुकसान झाले आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, शिरुर तालुक्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, कांदा पिकांचे नुकसान झाले आहे, सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील १५ हेक्टर क्षेत्रातील भात पिकाचे नुकसान झाले आहे.

मराठवाड्यालाही अवकाळीचा तडाखा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील संभाजीनगर, पैठण, गंगापूर, वैजापूर, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड, सोयगाव आणि फुलंब्री तालुक्यातील ४ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील  केळी, पपई व मका पिकांचे नुकसान झाले आहे.तसेच जालना जिल्ह्यातील बदनापूर, जालना, जाफराबाद तालुक्यातील ५ हजार २७९ हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, केळी, कांदा, खरीप ज्वारी, गहू व हरभरा पिकांचे नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील परळी, बीड तालुक्यातील २१५ हेक्टर क्षेत्रातील कांदा, ज्वारी, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील १०० हेक्टर क्षेत्रातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी, पूर्णा, पालम मानवत सोनपेठ, सेलू तालुक्यातील १ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी ज्वारी, कापूस, सीताफळ, पेरू, भाजीपाला या पिकांचे नुकसान झाले आहे, नांदेड जिल्ह्यातील नांदेड, मुदखेड तालुक्यातील ५० हेक्टर क्षेत्रातील केळी पिकाचे नुकसान झाले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बुलडाणा, नांदुरा, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगाव राजा, संग्रामपूर, मेहकर, जळगाव जामोद, मलकापूर, खामगाव, शेगाव, मोताळा, नांदुरा तालुक्यातील ३३ हजार ९५१ हेक्टर क्षेत्रातील भाजीपालाचे नुकसान झाले आहे.नुकसान झालेले क्षेत्र हे प्राथमिक अंदाजानुसार आहे. नुकसान झालेल्या क्षेत्रांचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी वेळेत सादर करावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केल्या आहेत.

SendShareTweet
Previous Post

कळंब-शिराढोण- लातूर शटल बससेवेचा खेळखंडोबा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान, प्रशासनाचे दुर्लक्ष

Next Post

भाव मिळेना, रस्त्यावर दूध ओतून आंदोलन, दरवाढीच्या मागणीसाठी स्वराज्य संघटना आक्रमक, शासनाचा निषेध

Related Posts

वन विभागाचे सर्च ऑपरेशन ठरला निव्वळ फार्स, चार दिवसांपासून वाघाकडून बैलांची शिकार, चोराखळीमध्ये शेतकरी धास्तावले

February 6, 2025

धाराशिवच्या माजी खासदाराची 70 लाखांची फसवणूक;पोलिसांकडून तपास सुरू

September 25, 2024

Martha Reservation कुणबी संदर्भात धाराशिवच्या समितीला हैद्राबादमधून मिळाले महत्वाचे दस्तावेज, तत्काळ निर्णय घ्या

September 22, 2024

Vidhan Parishad Award मराठवाड्याच्या प्रश्नांसाठी विधान परिषद गाजवलेल्या माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट भाषण पुरस्कार

September 4, 2024

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी डॉ.प्रतापसिंह पाटील यांची निवड; अभिनंदनाचा वर्षाव

February 22, 2024

अनोखी कला, धाराशिवच्या कलाकारांनी पेन्सिलच्या टोकावर दोन तासांत साकारले प्रभू श्रीराम; मोदींना भेट देण्याची इच्छा

January 16, 2024
Next Post

भाव मिळेना, रस्त्यावर दूध ओतून आंदोलन, दरवाढीच्या मागणीसाठी स्वराज्य संघटना आक्रमक, शासनाचा निषेध

आता पोलीस पाटील आंदोलनासाठी उतरणार आझाद मैदानात; वाशीमधून २५ पोलीस पाटलांचा सहभाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

हृदयद्रावक घटना..बुडणाऱ्या मित्राला वाचविण्यासाठी नदीत घेतली उडी,वाचवणारा तरुण गेला वाहून, १८ तासानंतर सापडला मृतदेह

August 31, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

लोहारा येथे सून आणि लेकाकडून वृद्ध महिलेचा खून

August 27, 2025

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group