प्रतिनिधी / धाराशिव
शासकीय वैद्यकीय महाविदयालय व जिल्हा रुग्णालयात नेत्रविभाच्या वतीने डॉ.रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मरणार्थ 10 जुन 2023 रोजी राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत दृष्टीदान दिन सप्ताहाचे उद़घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविदयालयाच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ.उज्जवला गवळी, अति जिल्हा शल्यचिकित्सक तथा वैद्यकीय अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ, डॉ.सचिन देशमुख नेत्रशल्यचिकित्सक डॉ.मुस्तफा पल्ला , डॉ.महेश पाटील, डॉ. विरभद्र कोटलवाड, डॉ श्वेता पवार तसेच अधिसेंविका सुमित्रा गोरे नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे, रामराजे बिडवे,जिल्हा रुग्णालयातील विविध विभागाच्या सर्व वॉर्ड इन्चार्ज व अधिपरीचारिका, नेत्रविभागाच्या वॉर्ड इन्चार्ज वहिदा शेख, तसेच सर्व नेत्रविभागातील अधिपरिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नेत्रशल्यचिकित्सक डॉ.महेश पाटील म्हणाले, डॉ.भालचंद्र यांनी सामाजिक भावनेतुन व कोणत्याही आधुनिक सोई सुविधा नसताना अंधत्व निर्मुलनाचे कार्य करुन हजारो लोकांना दृष्टी प्राप्त करुन दिले,यावेळी त्यांनी त्यांच्या दृष्टिदानाच्या कार्याला उजाळा दिला. तसेच मरणोत्तर नेत्रदानबाबत माहिती देऊन सर्वांना नेत्रदानचे संमतीपत्र भरुन देण्याबाबत आवाहन केले.
यावेळी समाजातील जास्तीत जास्त लोकांनी मरणोत्तर नेत्रदान करावे या उदेदशाने तालुक्यातील वाणेवाडी येथील मरणोत्तर नेत्रदान करणा-या कुंटुंबाचा मान्यवराच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच प्रभारी अधिष्ठाता डॉ.उज्जवला गवळी यांनी उपस्थित सर्वांना डॉ.भालचंद्र यांनी केलेल्या अंधत्व निर्मुलनाच्या केलेल्या कार्याला उद़ेशुन सदर सप्ताहाच्या कालावधतीमध्ये नेत्रदान बाबत जनजागृतीबरोबरच जास्तीत रुग्णांची नेत्रतपासणी करण्याबाबत आवाहन केले तसेच नेत्रदान ही महत्तवाची प्रक्रिया असुन अवयवदान ही एक काळाची गरज असुन याबाबतीत येणा-या कालावधी जास्तीत जास्त जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले.
डॉ.सचिन देशमुख यांनी यावेळी नेत्रविभागात सेवा देणा-या सर्व नेत्रशल्यचिकित्स, नर्सिंग स्टाफ, वर्ग ४ कर्मचारी, समुपदेशक या सर्वाचे विशेष कौतुक केले तसेच यापुढे देखिल मरणोत्तर नेत्रदानासाठी ग्रामीण भागातील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी शासकिय वैदयकिय महाविदयालय व जिल्हा रुग्णालय, उस्मानाबाद येथे नेत्रविभागाशी संपर्क करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार प्रदर्शन संतोष पोतदार यांनी केले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेत्रविभागातील सर्व अधिकारी,नर्सिंग स्टॉफ व वर्ग-४ कर्मचारी यांनी परिश्रम घेतले