• मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
Tuesday, January 27, 2026
Arambh Marathi
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर
No Result
View All Result
Arambh Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

अल्पवयीन मुलांच्या ताब्यात धोक्याचे हँडल; बेदरकारपणामुळे अपघात वाढले, शैक्षणिक परिसरात गर्दी

Aarambha Marathi by Aarambha Marathi
August 12, 2023
in आरंभ मराठी विशेष
0
0
SHARES
450
VIEWS
Share On WahtsAppShare on FacebookShare on Twitter

जबाबदारी कोणाची..? दुर्घटना रोखण्यासाठी काळजी घेण्याची गरज

शाम जाधवर / कळंब

शहरातील सर्वात मोठी असणारी शाळा म्हणजेच विद्याभवन हायस्कुल. बायपास रोड वर ही शाळा आहे आणि याच शाळेच्या आजूबाजूला जवळपास ३ ते ४ वेगवेगळी शिकवणी क्लासेस आहेत. सकाळी ६ ते दुपारी ४ पर्यंत हजारो विद्यार्थ्यांची ये-जा याच बायपास रस्त्यावरून होते. बायपास रस्त्यावर शाळेच्या परिसरात एकही गतिरोधक किंवा साधा सूचना फलकही उपलब्ध नाही. त्यामुळे कळंब बायपास रोडवर सतत अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात अल्पवयीन वाहन चालवणाऱ्यांची संख्या अधिक आहे हे विशेष. एखादी मोठी दुर्घटना घडण्याचा अगोदर शहर पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.


स्थळ विद्याभवन हायस्कुल समोरील बायपास रस्ता, वेळ – सकाळी सातची,  १५-१६ वर्षांची कोवळी पोरं… एक दुचाकी (गियर वाली) अन एकाच दुचाकीवर तिघेजण बसलेले. गाडीची गती ८० पेक्षा जास्त..त्यांच्या जोडीला आणखी एक दुचाकी त्यावरही तिघेजण विराजमान आणि मोठ्याने हॉर्न वाजवत एकमेकांना मागे टाकण्यासाठी त्यांची सुरु झालेली जीवघेणी स्पर्धा..
कळंब मधील बायपास रस्ता, तांदुळवाडी रोड येथील रंगीला चौक या ठिकाणी असे चित्र रोजच पाहायला मिळत आहे. १८ वर्षांखालील मुलांना ड्रायव्हिंग लायसन्स मिळत नाही म्हणजेच त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसतेच, तरीही आपल्या लाडक्यांना गाडी चालवण्यास दिल्या जातात, त्यामुळे पालक याबाबत गंभीर का होत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो.


मुलगा ९ वी किंवा १० वी ला गेला की, आपला मुलगा आता मोठा झालाय त्याचा गाडीचा हट्ट पुरविणे हे आपले आद्य कर्तव्यच आहे. काहीशा अशा जणू विचाराने अविर्भावात पालक आपल्या मुलांचा हट्ट पुरवितात. परंतु त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात.


काय सांगतो कायदा?
■ज्या व्यक्तीकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही अशा व्यक्तीस वाहन चालविण्यास दिल्यास (कलम १८१) :- वाहन मालकास ३ महिने कैद, १ हजार रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.

■ दुचाकी वाहनांच्या मागील बाजूस बसणे (कलम १२८):- दुचाकी वाहन चालकाने आपले वाहनाचे मागील सीटवर एकापेक्षा अधिक व्यक्ती नेऊ नयेत.

■अनावश्यक हॉर्नचा वापर :- चालकाने गरज नसताना व आवश्यकतेपेक्षा अधिक हॉर्नचा वापर करता कामा नये. हॉर्न सतत दाबून धरणे गुन्हा आहे. विविध आवाजाची धुन असणारे (जनावरांचे आवाज, मुलाच्या रडण्याचे आवाज, रिव्हर्ज हॉर्न) हॉर्न वाजविण्यास बंदी आहे.

■२०१९ चा सुधारित मोटर व्हेईकल्स ॲक्ट म्हणून, पहिल्या अपराधासाठी इन्श्युरन्सशिवाय वाहन चालविण्यासाठी दंड रु. २००० आणि त्यानंतरच्या अपराधासाठी रु. ४००० आहे. यामुळे कायद्याच्या विवेकबुद्धीनुसार ३ महिन्यांसाठी कारावासही होऊ शकतो. “इन्श्युरन्सशिवाय वाहन चालवणे” या अपराधासाठी कलम १९६ नुसार वरील दंड लागू आहे.


अल्पवयीन मुलांवर कारवाया केल्या
यापूर्वीही अशा वाहनांवर आम्ही कारवाया केलेल्या आहेत. पालकांनीही कायद्याचे भान ठेऊन आपल्या लहान मुलांकडे वाहन देणे टाळले पाहिजे. लहान मुलांकडे वाहन दिसल्यास त्यासाठी आम्ही पालकांना जबाबदार धरून पालकांवर कारवाई करणार आहोत.
– सुरेश साबळे, पोलीस निरीक्षक, कळंब


रोटरी लावणार फलक
अपघात टाळण्यासाठी विद्याभवन हायस्कुल आणि बायपास रोडवर “पुढे शाळा आहे वाहने सावकाश चालवा” असे फलक रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी मार्फत लावण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. लवकरच याची पूर्तता होईल.
– रवी नारकर, अध्यक्ष, रोटरी क्लब, कळंब

SendShareTweet
Previous Post

शाब्बास तरुणांनो…! सर्वात मोठी सायकल यात्रा कन्याकुमारीत दाखल; ऊन-पाऊस झेलत आठ दिवसात 1362 किलोमीटर अंतर केले पार

Next Post

Good News; मंगळवारपासून राज्यातील सर्व सरकारी रूग्णालयातून मिळणार मोफत उपचार

Related Posts

Breaking तुळजापूरमध्ये विनोद गंगणे, उमरगामध्ये किरण गायकवाड यांची आघाडी; धाराशिवमध्ये प्रशासन झोपेतच, मतमोजणीला विलंब

December 21, 2025

ब्रेकिंग..धाराशिवमध्ये शिवसेना पुन्हा भाजपच्याच पाठीशी; नगराध्यक्षपदासाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा, पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

November 28, 2025

सूत्र ठरले, उद्या जिल्हा समितीच्या निधीची स्थगिती उठणार ?

October 14, 2025

Breaking शेतकऱ्यांना दिलासा; धाराशिव जिल्ह्यासाठी अतिवृष्टीची १८९ कोटी रुपये मदत जाहीर

September 23, 2025

मुंबईत मराठ्यांचा जनसागर; जागोजागी रस्ते ठप्प,सरकारला धडकी भरवणारी गर्दी

August 29, 2025

तुळजाभवानी मंदिर परिसरात थुंकणाऱ्या पुजाऱ्यांवर अखेर कारवाई; 6 जणांना एक महिना, खुलासा न करणाऱ्या दोघांना 3 महिने मंदिरात नो एन्ट्री

July 3, 2025
Next Post

Good News; मंगळवारपासून राज्यातील सर्व सरकारी रूग्णालयातून मिळणार मोफत उपचार

MKCL च्या प्रश्नमंजुषा स्पर्धेला भरभरून प्रतिसाद, स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजन,जिल्ह्यात लाखावर विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या घडामोडी

अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; भाजप जिल्हाध्यक्षांच्या समर्थनानंतर चर्चांना पूर्णविराम

January 27, 2026

उमेदवारी माघारीच्या अखेरच्या दिवशी अर्चनाताई पाटील यांच्या उमेदवारीचा अनपेक्षित ट्विस्ट

January 27, 2026

शिवसेना उबाठा गटाला आणखी एक धक्का, उपजिल्हा प्रमुखांचा भाजपमध्ये प्रवेश

January 27, 2026

सर्वाधिक पसंतीचे

  • Dharashiv News इतिहासात पहिल्यांदाच धाराशिवमध्ये आढळला वाघ; रामलिंग अभयारण्यात सीसीटीव्हीमध्ये 3 वर्षांचा वाघ कैद, वन विभाग अलर्ट

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अखेर खरीप पीक विम्याचे वाटप सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking भरधाव ट्रकने विद्यार्थ्याला चिरडले,विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू; बायपासला सर्व्हिस रोड नसल्याने चिमुकल्याचा बळी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking महावितरणच्या सहायक अभियंत्याला बेदम मारहाण, डोक्यात खुर्ची घातल्याने रक्तबंबाळ; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षासह भाजपच्या नगरसेवकांवर गुन्हा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking धाराशिवमध्ये तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • सत्ताकारण
  • शैक्षणिक
  • कृषी
  • मनोरंजन
  • स्पोर्ट्स
  • बिझनेस
  • नोकरी
  • राशिफल
  • इतर
    • पुणे
    • मराठवाडा
    • मुंबई
    • देश
    • विदेश
  • ई पेपर

© 2023Website Designed By DK Technos

Join WhatsApp Group