प्रतिनिधी / धाराशिव
समता नगर भागातील माळी घर ते नागणे घर सिमेंट काँक्रिट रस्ता व नाली कामाचा शुभारंभ माजी गटनेते युवराज नळे यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी करण्यात आला. रखडलेल्या या कामासाठी समता गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष नाना घाडगे, सचिव पंकज पडवळ यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर या कामाचे तातडीने उद्घाटन करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सुजित साळुंके, माजी नगरसेवक ऍड.विशाल साखरे, सचिन शिंदे, माळी काका, राजाभाऊ कारंडे, शिवाजी मोरे, मच्छिंद्र तुंदारे, वासुदेव वेदपाठक, ॲड. बोंदर, खंडू काटे, पुष्पा ताई शिंदे, मंजुषा ताई साखरे,सराव काकू, कदम काकु, पडवळ काकू तसेच इतर महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रभागातील इतरही रस्त्यांच्या कामासाठी मी व माझ्या सहकारी माजी नगरसेविका सुनिता साळुंके यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी शासनाकडून ३.७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. त्याही रस्ते व नाल्यांची कामे अंडरग्राऊंड ड्रेनेजची पाईपलाईनचे काम होताच करण्यात येणार आहेत,असे युवराज नळे यांनी सांगितले.दरम्यान, सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.












