प्रतिनिधी / वाशी
शहरातील लक्ष्मी रोडवरील वरच्या जुन्या वेस येथील हनुमान मंदिराच्या शिखर-कळस बांधकामाचा शुभारंभ रविवारी (दि.३०) करण्यात आला. मंदिरावरील स्लॅबपासून ३१ फूट उंच शिखर बांधकाम होणार आहे. या शिखर बांधकाम शुभारंभावेळी शहरातील नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
शहराचे प्रवेशद्वार असलेल्या तहसील रोडवरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर जवळ पुरातन श्री हनुमान मंदिर असून, या मंदिराला शिखर नव्हते. त्यामुळे मंदिराला शिखर बांधण्याचा संकल्प येथील शहरवासीयांनी केला होता. त्यानुषंगाने ३१ फूट उंच शिखर व मंदिरावर चार वानर मूर्ती असे बांधकाम रंगरंगोटीसह करण्यात येणार आहे. नांदेड जिल्ह्यातील कारागिरांना या शिखराचे बांधकाम देण्यात आले आहे. लोकवर्गणीतून शिखर बांधकाम करण्यात येणार असून, त्यानुषंगाने शहरवासियांकडून स्वच्छेने लोकवर्गणी जमा केली जात आहे.