सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे घरगुती गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे भडका उडून भाजलेल्या दुसऱ्या मुलीचाही उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. प्रमीला मन्नाराम चौधरी (वय अंदाजे 10 वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव असून गंभीर जखमी असलेल्या मन्नाराम चौधरी यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दि. 4 जून रोजी गीता मन्नाराम चौधरी हिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.