आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजापूर येथील मतदान प्रक्रियेदरम्यान एक दुःखद घटना घडली. दुपारी साधारण १२ वाजण्याच्या सुमारास मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या एका वयस्कर महिलेला अचानक चक्कर येऊन त्या खाली कोसळल्या. त्यानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी तत्काळ त्यांना मदत करत उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे हलविले.
रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळाने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या महिलेला मृत घोषित केले. तहसीलदार, तुळजापूर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ही घटना अचानक घडली असून संबंधित विभागाकडून पुढील तपास सुरू आहे. मतदानाच्या दिवशी घडलेल्या या अनपेक्षित घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.










