प्रतिनिधी / धाराशिव
बँकिंग, कारखाने, माती परीक्षण, सहकार क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या आणि वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या श्री.सिद्धिविनायक परिवाराने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे. परिवाराने विमा क्षेत्रातही काम करण्याचा निर्णय घेतला असून, नववर्षाच्या प्रारंभी या क्षेत्रात कामाला सुरूवात झाली आहे. दरम्यान, यामुळे परिवाराशी संबधित सुमारे 30 हजार नागरिकांना विमा पॉलिसीचा भाग बनता येईल आणि अन्य सर्व घटकांना या क्षेत्रात जोडून घेता येईल असा विश्वास परिवाराचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
धाराशिव जिल्ह्यात कार्यरत असलेल्या व मागील दशकापासून ग्राहक, शेतकरी, सभासद, खातेदार, हितचिंतक यांच्या विश्वासास पात्र असलेला श्री सिध्दीविनायक परिवार विमा (इन्शुरंस) क्षेत्रातही कार्य करणार आहे.
नूतन वर्ष २०२४ पासून श्री सिध्दीविनायक मल्टीस्टेट व जिल्हा पतसंस्थाच्या सर्व शाखांच्या माध्यमातून ग्राहकांना आता सर्व प्रकारच्या जनरल वाहनांचा,आरोग्याचा, वस्तूंचा, मशिनरी व अन्य जोखमीचा विमा याद्वारे काढता येईल. तसेच गुंतवणुकीचे पर्याय असलेली सर्व प्रकारचे विमा (इन्शुरंस) आता काढता येतील.
देशातील प्रमुख विमा कंपन्यासोबत श्री सिध्दीविनायक परिवाराने याविषयी करार केलेला असुन लवकरच सर्व शाखांच्या माध्यमातून सर्वच प्रकारचा विमा आता ग्राहकांना माफक सवलतीच्या दरात उपलब्ध होईल.
श्री सिध्दीविनायक परिवाराशी वेगवेगळ्या उपक्रम, उद्योगाच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या ३० हजारहून अधिक व्यक्तींना,ग्राहकांना याचा लाभ घेता येईल.