आरंभ मराठी / धाराशिव
जिल्ह्यात पेटलेल्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा धाराशिव जिल्हा रद्द झाला असून,आता हा दौरा विशेष अधिवेशनानंतर होण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार होते. त्यांची जिल्ह्यात चार ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेची जय्यत तयारी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात मराठा आंदोलनाची धग वाढली असून, विशेषतः धाराशिव जिल्ह्यात आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे. गुरूवारी दिवसभर आंदोलन उग्र रूप घेत होते. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आपला दौरा पुढे ढकलला असल्याचे सांगण्यात येत आहे.