प्रतिनिधी / धाराशिव
मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या अध्यक्षपदी अमरसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. शिवजन्मोत्सव समितीच्या (2024) पदाधिकारी निवडीसंदर्भात सोमवारी सकाळी हॉटेल रोमा येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते ही निवड करण्यात आली. या निवडीबद्दल देशमुख यांचे अभिनंदन होत आहे.
मध्यवर्ती शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शहरात दरवर्षी भरगच्च कार्यक्रम आयोजित केले जातात. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या या समितीच्या अध्यक्षपदी दरवर्षी विविध समाजातील नवीन व्यक्तीला संधी मिळते. गेल्यावर्षी देखील समितीने भव्य कार्यक्रम आयोजित केले होते. शंभूराजे महानाट्य कार्यक्रमाला शिवप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला तसेच आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले होते.
यावर्षीही भव्य कार्यक्रम
समितीच्या वतीने शहरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. समितीच्या अध्यक्षपदी अमरसिंह देशमुख यांची निवड झाली असून, उर्वरित पदाधिकाऱ्यांच्या निवडी लवकरच करण्यात येणार आहेत. त्यानंतर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे. यावर्षीचा शिवजन्मोत्सव सोहळा अविस्मरणीय होईल, असा विश्वास अमरसिंह देशमुख यांनी व्यक्त केला. दरम्यान समितीच्या निवडीच्या या बैठकीसाठी समितीचे मार्गदर्शक प्रकाश जगताप, भारत कोकाटे, दत्ता बंडगर, बाळासाहेब शिंदे, भारत इंगळे, मसूद शेख, खलिल सय्यद, अंबादास दानवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.