प्रतिनिधी / शिराढोण
कळंब तालुक्यात शिराढोण येथे १९ ते २९ सप्टेंबर या कालावधीत श्री १००८ आदिनाथ दिंगबर जैन मंदिर व श्री १००८ पार्श्वनाथ दिंगबर जैन मंदिर या दोन्ही मंदिरमध्ये पर्युषण पर्व पार पडला. या कालावधीत रोज सकाळी अभिषेक,पुजा, शांती विधान,भक्तांबर विधान,सम्मेद शिखरजी पुजा व आरती असे कार्यक्रम पार पडले.दशलक्षण धर्मामध्ये उत्तम क्षमा, मार्दव, आर्जव, शौच, सत्य, संयम,तप,त्याग,आंकिचन व उत्तम ब्रह्मचर्य असे दशलक्षण धर्म आहेत.
30 सप्टेंबर रोजी शिराढोण येथील श्री १००८ आदिनाथ दिंगबर जैन मंदिर येथून दुपारी ४ वाजता पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यांमध्ये इंद्र इंद्रायणी चढाव श्री व सौ.सुमित झाडे यांनी घेतला, सर्व श्रावकांनी उपस्थित राहून शोभा वाढविली. तसेच पालखी झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा व समाजातील गुणवंतांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मनोज शांतीनाथ होसाळे, सौ कांचनमाला उत्कर्ष संगवे, हर्षद धन्यकुमार अंबुरे,
कोमल जेगावकर, जेगावकर नम्रता अंनत, श्वेता जवाहर येणगुरे, उन्नती उत्कर्ष संगवे, आरती मनोज पाटवदकर यांचा सत्कार सकल जैन समाज शिराढोण यांच्यातर्फे करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्ष अशोक संगवे व प्रमुख पाहुणे वर्धमान जेगावकर होते. सत्कार सारिका पाटवदकर, स्नेहलता बिडकर, प्रतिभा जेगावकर, उज्ज्वला कोंडेकर,सुमन भगरे, तृप्ती संगवे, पद्मराज सांगोळे व उत्कर्ष संगवे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी पाठशाळेच्या मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप हर्षद अंबुरे, प्रमोद बिडकर यांनी केले.
अखिल दिंगबर जैन सैतवाल संस्था मुंबई या संस्थेच्यावतीने सैतवाल जनगणना करण्यासाठी संस्थेचे धाराशिव जिल्हा सचिव शप्रणित प्रकाश संगवे यांनी आवाहन केले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विशाल संगवे व आभार प्रदर्शन मनोज होसाळे यांनी केले.या कार्यक्रमात शिराढोण मधील सकल जैन समाज, अखिल दिंगबर जैन सैतवाल संस्था, भारतीय जैन संघटना व शांतीसागर युवा मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते.