आरंभ मराठी / धाराशिव
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे ७ व ८ ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यामध्ये महसूल विभागाचे बरेच प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.
बावनकुळे हे छत्रपती संभाजीनगर येथून मोटारीने ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:३० वाजता धाराशिव येथे आगमन.
करतील। सकाळी ११ : ४० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे नागरिकांची निवेदने स्वीकारतील. दुपारी १२:४० वाजता जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या समवेत महसूल विभागाचा आढावा घेतील.
दुपारी २ वाजता जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचा व दुपारी २.४५ वाजता जिल्ह्यातील भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेतील. दुपारी ३:३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पत्रकार परिषद घेतील. दुपारी ४ वाजता भाजप कार्यालय, प्रतिष्ठान भवन येथे राखीव.
सायंकाळी ५ वाजता मोटारीने धाराशिव येथून तुळजापूरकडे प्रयाण करतील. सायंकाळी ५:३० वाजता तुळजापूर येथे आगमन व आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतील. सायंकाळी ६ वाजता भवानी तीर्थकुंड,घाटशीळ रोड पार्किंग तुळजापूर येथे श्रीक्षेत्र तुळजापूर विकास आराखडा मंजूर केल्याबद्दल तुळजापूर नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
सायंकाळी ७ वाजता मोटारीने धाराशिवकडे प्रयाण. सायंकाळी ७:३० वाजता धाराशिव शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता मोटारीने धाराशिव येथून मुरूम,ता. उमरगाकडे प्रयाण.सकाळी ९ वाजता मुरूम येथे आगमन व बसवराज पाटील यांच्याकडे राखीव. सकाळी ९:३० वाजता श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना मुरूम येथे आयोजित शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहतील.
सकाळी ११ वाजता मोटारीने मुरूम येथून जालन्याकडे प्रयाण करतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने देखील ते तयारीचा आढावा घेतील तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना सूचना देतील.