प्रतिनिधी / पुणे
श्री.दासबोध सखोल अभ्यास उपक्रमाचे संचालक तथा महाराष्ट्र ग्राहक पंचायतचे अध्यक्ष, समर्थ विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य स.भ.डॉ विजय लाड यांच्या ‘दासबोध चिंतन सार ‘ या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सोनोपंत तथा हभप मामासाहेब दांडेकर पुरस्कार प्राप्त झाला आहे.
पुणे येथे संत तुकारामाचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते सोमवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेशबुवा तसेच अजेयबुवा, विद्यापीठाच्या उपकुलसचिव ज्योती भिडे, श्री. दासबोध सखोल अभ्यास उपक्रम परिवाराचे सदस्य यावेळी उपस्थित होते.डॉ.विजय लाड यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.