आरोपींची संख्या 35
आरंभ मराठी / तुळजापूर
तुळजापूर ड्रग्स प्रकरणी पोलिसांचा तपास दिवसेंदिवस गतिमान होत असून, बुधवारी या प्रकरणात नवीन 10 संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या आता 35 झाली आहे.
आतापर्यंत एकूण 14 जणांना अटक करण्यात आली असून, त्यामधील 10 न्यायालयीन कोठडीत तर 4 आरोपी पोलीस कोठडीत आहेत. तुळजापूर येथे होत असलेल्या ड्रग्स विक्रीच्या रॅकेटमध्ये पोलिसांनी अधिक तपास केला असता, आणखी 10 आरोपी निष्पन्न झाले. यामध्ये विनायक इंगळे, शाम भोसले, संदीप टोले, जगदीश पाटील, विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव, दुर्गेश पवार, रणजीत पाटील, नाना खुराडे (सर्व रा. तुळजापूर) आणि अर्जुन हजारे (रा.उपळाई खुर्द सोलापूर) या 10 नवीन आरोपींचा सहभाग या प्रकरणामध्ये निष्पन्न झाला आहे.
दरम्यान पोलीस या प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत असून, लवकरच यांना अटक केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात आत्तापर्यंत अनेक मोठी नावे समोर आल्याने तुळजापूर शहरात खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
काल रात्री उशिरा अटक केलेल्या गजानन हंगरकर याला आज 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात आता 14 आरोपी अटकेत असून 21 आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.