प्रतिनिधी / धाराशिव
वाशी तालुक्यातील मांडवा येथील उपसरपंच भगतसिंग गहेरवार यांची स्नुषा पूनम अनिलसिंह राजपूत-गहेरवार यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कायद्याच्या पदवीचे शिक्षण पूर्ण केले. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट अ परीक्षेत देदीप्यमान यश मिळवले. या यशाबद्दल पूनम यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मांडवा येथे त्यांचा सन्मान करण्यात आला.
पूनम यांनी सोलापूर येथील विधी महाविद्यालयातून कायद्याची पदवी प्राप्त केली. तर कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून डिपार्टमेंटल ऑफ लॉ पदवी संपादन केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण पूर्ण करून पुनम यांच्या जिद्दीला त्यांची आई कमल राजपूत,शिल्पा राजपूत यांनी प्रोत्साहन देण्याचे काम केले. दिग्विजय गहेरवार यांच्यासह सासरे भगतसिंह गहेरवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली.2022 च्या परीक्षेमध्ये सहाय्यक सरकारी अभियंता गट-अ पदाला पूनम अनिल सिंग राजपूत-गहेरवार यांनी यशाला गवसनी घातली आहे.या यशाबद्दल मित्र-परिवारासह महाराणा प्रताप सिंह सार्वजनिक उत्सव समिती धाराशिव,शोभा चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य उमेश देशमुख,सुनील पाटील, डॉ.शशिकांत पाटील आदींनी त्यांचे अभिनंदन करून सन्मान केला.गावकऱ्यांनीही त्यांच्या यशाबद्दल मनस्वी अभिनंदन केले.