वंचित आघाडीच्या उमेदवाराचा आकडा वाढेना
आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू असून, टपाली मतदानापासून दुसऱ्या फेरीपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आघाडीवर असल्याने शिवसैनिकांमध्ये तसेच आघाडीमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. लीड वाढत असल्याने जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे. दुसऱ्या फेरीअखेर जवळपास 26 हजारांनी ओमराजे आघाडीवर आहेत.दरम्यान, गेल्यावेळी जवळपास 98 हजार मते घेणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला यावेळी मात्र मतदान नगण्य असल्याची स्थिती आहे.
उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सुरुवातीला टपाली मतदान मोजण्यात आले. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनाच लीड मिळाली. त्यानंतर पहिल्या आणि दुसऱ्या फेरीतही ओमराजे निंबाळकर पुढे राहिले. शिवसैनिकांना तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना ओमराजे निंबाळकर निवडून येण्याची खात्री असल्याने दोन दिवसांपासूनच जिल्ह्यात जल्लोष केला जात आहे.
सोमवारी सायंकाळी धाराशिव शहरात शिवसैनिकांनी ओमराजे निंबाळकर यांच्या विजयाचे बॅनर लावून लाडू वाटप करून जल्लोष केला होता. शिवसैनिकांना ओमराजे निंबाळकर निवडून येण्याची खात्री वाटत असल्याने जल्लोषाची तयारी सुरू झाली आहे दरम्यान आतापर्यंत दोन फेऱ्या झाल्या असून, अजून 28 फेऱ्या बाकी आहेत.त्यामुळे मतदानाच्या आकडेवारीत काही प्रमाणात बदलही होऊ शकतो. मात्र महाविकास आघाडीचे कार्यकर्ते जल्लोषासाठी मतमोजणीच्या ठिकाणी एकत्र येऊ लागले आहेत.