गजानन तोडकर / कळंब
कळंब बाजार समितीची 69 वी सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. या सभेत तालुक्यातील चाळीस जणांचा सत्कार करण्यात आला. सभेसमोर ठेवण्यात आलेले आठ विषय मंजूर करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर omprakash rajenimbalkar यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 40 जणांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना खासदार ओमराजे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी अपेक्षा केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती शिवाजी कापसे तर व्यासपीठावर खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील,मकरंद राजे निंबाळकर, माजी आमदार दयानंद गायकवाड, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रा. श्रीधर बाबा भवर, प्रा. संजय कांबळे, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, कांचनमाला संगवे ,ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव यांच्यासह बाजार समितीचे संचालक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय वाघ यांनी केले, तर प्रास्ताविक सभापती शिवाजी कापसे तर संचालक भारत सांगळे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार उपसभापती प्रा. श्रीधर बाबा भवर यांनी मानले.या वेळी तालुक्यातील शेतकरी, सोसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, व्यापारी उपस्थित होते.
शासनात खोकेवाल्यांची भरती, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला त्यांना वेळ नाही-खा.ओमराजे
शासन आपल्या दारी या उपक्रमावर लाखो रुपये खर्च करूनही काही फायदा झालेला नाही. शासनाने प्राधान्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. पण सध्या शासनात खोकेवाल्याची भरती झाल्याने त्यांना जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही.शासन पावलोपावली अडवणुक करत आहे. येणाऱ्या निवडणुकीत यांना घरचा रस्ता दाखवण्याची विनंती खासदार ओमराजे यांनी यावेळी केली.
विकासासाठी एकत्र या; आ.कैलास पाटील
स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करा असे सांगितले होते. त्यांचे आम्ही पालन करत आहोत. पण काहीजण विकास कामात आडकाठी आणून वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. विकासासाठी एकत्र या, असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले. ते म्हणाले, सर्वसामान्यांची ही बाजार समिती राज्यामधील मॉडेल ठरणार आहे. बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे आणि संचालक मंडळाने चांगले निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे आ. कैलास पाटील यांनी कौतुक केले.
शेतकरी हाच मालक; शिवाजी अप्पा कापसे