प्रतिनिधी / धाराशिव
धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त बेगडा जिल्हा परिषद शाळा व खानापूर येथील नागनाथ निवासी गतिमंद विद्यालयात शिवशाही युवा प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले तसेच गतिमंद मुलांच्या हस्ते केक वाढविण्यात आला.
हा कार्यक्रम धाराशिव येथील शिवशाही युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लखन (बापू) देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.यावेळी अभिजित देशमुख, आतिष पाटील, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश सोमाणी, माजी नगरसेवक तथा धाराशिव शहरप्रमुख सोमनाथ गुरव,संकेत सूर्यवंशी,बाळासाहेब काकडे,महेश लिमये यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.