प्रतिनिधी / धाराशिव
येथील समता गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या निवडणुकीत समता सहकार विकास पॅनेलचा दणदणीत विजय झाला असून, पॅनेलचे सर्वच १७ उमेदवार बहुमताने विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच्या कामाची दखल घेत समतावासीयांनी सत्ताधारी पॅनेलला पसंती दिली असून, या विजयाबद्दल नाना घाटगे यांनी मतदारांचे आभार मानले आहेत.
समता गृहनिर्माण सहकारी संस्थेच्याच्या निवडणुकीमध्ये समता सहकार विकास पॅनलचा दणदणीत एकतर्फी विजय झाला आहे.
समता सहकारी गृहनिर्माण संस्था मराठवाड्यामध्ये नावारूपास आलेली एकमेव गृहनिर्माण संस्था असून संस्थेच्या २०२३-२८
या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २५ जून रोजी निवडणूक झाली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीमध्ये समता सहकार विकास पॅनलचे सर्वच्या सर्व उमेदवार खालीलप्रमाणे प्रचंड बहुमतांनी निवडून आले आहेत. निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुदर्शन शिंदे यांनी काम पहिले.
विजयी उमेदवारांना मिळालेली मते
घाटगे संतोष (नाना) दत्तात्रय – ११०
जगदाळे सुधीर शिवाजी – ११०
जोशी रामचंद्र मधुकर – १०९
काझी मिरफारुख अली वल्दमीर हुसेन अली – १०९
खिचडे विठ्ठल गणपती – १०९
माळी बिभीषण विठ्ठलराव – ११०
मोमीन असिफ मुजाहिद – १०९
पडवळ पंकज शिवाजी – ११३
पाटील नारायण किसनराव – १०८
शेख आयुब इसाक – १०८
टेकाळे शेषेराव श्रीरंग – १०७
वेदपाठक वासुदेव हरिशचंद्र – १०७
कदम सुरेखा गोकुळ – १११
पाटील वैशाली सुभाष – १०७
भोसले दगडू बळीराम – ११३
पाटील अतुल देविदास – १११
पुरी सुरेश दिगंबर – बिनविरोध विजयी
विश्वासाला पात्र राहून ‘समता’चा विकास करू
सर्वच १७ उमेदवारांना मतदारांनी एकतर्फी पसंती दिली व समता सहकार विकास पॅनलच्या एकहाती सत्ता दिली. लढतीमध्ये मतदारांनी आमच्यावर विश्वास टाकून हाती दिलेल्या सत्तेच्या माध्यमातून समता सोसायटीचा व समता नागरवासियांचा विश्वास सार्थकी लावण्याची ग्वाही समता परिवाराचे नाना घाटगे यांनी दिली आहे.