आरंभ मराठी / धाराशिव
सोलापूरमध्ये आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज, असा सवाल केल्यानंतर राज ठाकरे यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे. धारशिवमध्ये राज ठाकरे मुक्कामासाठी आले आहेत. त्यांना भेटून जाब विचारण्यासाठी मराठा बांधव हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्यांना ठाकरे यांनी भेट नाकारली आहे. त्यामुळे मराठा तरुणांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास धाराशिव शहरात दाखल झाले त्यांनी सोलापूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मराठा समाजाला आरक्षणाची गरज काय असा प्रश्न केला होता तसेच तसेच मराठा समाजाच्या विरोधात त्यांनी वक्तव्य केल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून राज ठाकरे आज सायंकाळी शहरातील हॉटेल पुष्पक येथे दाखल झाल्यानंतर त्यांना जाब विचारण्यासाठी मराठा तरुणांची गर्दी झाली. मात्र ठाकरे यांनी त्यांची भेट नाकारल्याने गोंधळ उडाला आहे.ठाकरे तिसऱ्या मजल्यावर थांबले असून, त्यांच्या रूमपर्यंत मराठा कार्यकर्त्यांना पोलिसांनी जाऊ दिले नाही. त्यामुळे पहिल्या मजल्यावरच्या घोषणाबाजी सुरू झाली. ठाकरे यांनी केवळ एका तरुणाने येऊन भेटावे, अशी अपेक्षा केली मात्र तरुणांनी सगळ्यांनाच भेट घ्यायची आहे, असा पवित्र घेतला. ठाकरे यांच्यासोबत असलेल्या मुंबईतील नेत्यांनी मराठा कार्यकर्त्यांना दमबाजी केल्याचाही आरोप तरुणांनी केला आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनत आहे.