आरंभ मराठी / अंतरवाली सराटी
मराठा Maratha reservation समाजाला आरक्षण देण्यासाठी आज महाराष्ट्र विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला सरकारने आरक्षण जाहीर केले.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील Manoj jarange patil यांनी या आरक्षणाचे स्वागत करून, आमची ही मागणी नव्हतीच, असे सांगितले आहे. विशेष अधिवेशनात सग्यासोयऱ्याच्या अधिसूचनेबद्दल सरकारने एकही शब्द काढला नाही. त्यामुळे आजपासून मी सर्व वैद्यकीय उपचार आणि सलाईन बंद करत आहे, उद्या आंतरवली सराटी या गावात दुपारी बारा वाजता अंतिम बैठक घेऊन आंदोलनाची दिशा स्पष्ट केली जाईल, उद्याच्या बैठकीला महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांनी उपस्थित राहावे, असेही आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
सगेसोयरे या शब्दावर सहा लाख हरकती आल्या असे मुख्यमंत्री सांगतात मग त्या हरकतीचे काय करायचे यासंबंधी व्यवस्था त्यांच्याकडे उपलब्ध आहे, मनात आणले तर दोन दिवसात सर्व हरकतीवरील प्रश्न सोडवता आला असता. आम्ही जे मागितले नाही ते आरक्षण सरकारने दिले परंतु त्यामुळे मूळ प्रश्नापासून आम्ही हटणार नाही, मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण हवे आहे आणि तेच आरक्षण टिकणार आहे,अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषदेत मांडली. उद्याची बैठक ही आंदोलनाला अंतिम दिशा देणारी असेल. आम्ही अजूनही शांततेत आंदोलन करण्याचा मताचे आहोत. सरकारला आम्ही पुरेसा वेळ दिलेला आहे, सहा लाख हरकतींचा मुद्दा पुढे करून आमच्यावर धूळफेक करू नका, अन्यथा सरकारला ही लढाई जड जाईल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.