प्रतिनिधी / धाराशिव
वाशी तालुक्यातील मांडवा येथे सरपंच डॉ.योगिनी संजय देशमुख यांच्या हस्ते सलग तीन दिवस ध्वजारोहण करून स्वातंत्र्य दिनाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात आला.
भारत देशाच्या या अमृत महोत्सव दिनी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात कोनशीला उभारून देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या थोर विभूतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी गावातील वेगवेगळ्या शाळेचे विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, तरुण वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक तथा जिल्हा परिषदेचे पहिले कृषी सभापती लक्ष्मणराव देशमुख यांचा सत्कार माजी उपसरपंच नितीन रणदिवे यांनी फेटा बांधून,शाल श्रीफळ देऊन केला. याप्रसंगी जनता विद्यालय,जिजामाता कन्या प्रशाला,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडीचे सर्व कर्मचारी तसेच गावातील नागरिक ध्वजारोहण कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित होते.तसेच संजय देशमुख, नितीन रणदिवे, धोंडीराम पाटील, ग्रामसेवक गिरी,बापु पाटील, सुरेश परिहार,बाबा पठाण, जयराज परिहार,तानाजी माळी, कोंडीराम माळी,समाधान देशमुख,उत्तम गरड,अनिस काझी,कौसर शेख,शरद शिंदे, विलास साबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.