कपील माने | मंगरुळ
मंगरूळ (ता कळंब) परिसरात बळीराजा अजूनही वरुणराजाच्या प्रतिक्षेत!
हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झालेला आहे त्यामुळे राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे परंतु धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मंगरूळ भागात पाऊस कुठे??? हा प्रश्न येथील बळीराजाला पडला आहे म्हणूनच शेतकरी अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत बसला आहे अगोदरच पावसाने जून उलटूनही दडी मारल्यामुळे बळीराजा अजूनही चिंतेत दिसत आहे पेरणीसाठी आवश्यक असणारी सर्व शेती मशागतीचे कामे बळीराजा पूर्ण करून वरुण राजाच्या प्रतिक्षेत बसला आहे
पेरणी साठी अगोदरच महिना उशीर झाला आणि त्यात मान्सून महाराष्ट्रात दाखल होवूनही हवा तसा पाऊस मंगरूळ परिसरात झालेला नाही त्यामुळे येथील बळीराजा चिंतेत दिसत आहे पेरणीसाठी महिना उलटून गेलेला असतानाही पेरणीयोग्य पाऊस न झाल्यामुळे
बळीराजा पेरणीसाठी थांबलेला आहे त्यातच कृषी विभागांनी 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे निर्देश दिलेले आहेत वरुण राजाने लवकरात लवकर कृपा दाखवून पेरणी होईल याच आशेवर येथील बळीराजा बसला आहे.