वृक्ष लागवड चळवळीस शंकरबापू विद्यालयाचा सहभाग
प्रतिनिधी / कळंब
कळंब शहर व परिसरात शनिवारी 11 हजार 111 झाडे लावण्याचा संकल्प उस्मानाबादचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी एम. रमेश व कळंब पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांच्या संकल्पनेतून सुरू आहे.त्याची तयारी सुरू असून,या पर्यावरणपूरक उपक्रमात विद्यार्थ्यांचाही सहभाग नोंदवला जात आहे.हासेगाव येथील पद्मश्री शंकरबापू माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी ट्री गार्ड बांधणीचे काम मंगळवारी केले.
वृक्ष लागवडीची ही संकल्पना आता कळंबकरांची व परिसरातील नागरिकांची चळवळ बनली असून, याचाच एक भाग म्हणून हसेगाव के येथील पद्मश्री शंकरबापू विद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी यांनी आज ट्री गार्ड बांधणीचे काम केले. असाच सर्वानी सहभाग घ्यावा असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश साबळे यांनी केले आहे. यावेळी शाळेचे मार्गदर्शक तथा कळंब कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विलास पाटील, व्यापारी आनंद बलाई, संजय देवडा, डॉ अशोक शिंपले, मुख्याध्यापक परमेश्वर पालकर आदी उपस्थित होते.