सकल कळंबकरांचा प्रतिसाद, लोकवाट्यातूनन जमा झाले साडेसहा लाख रुपये
प्रतिनिधी / कळंब
कळंब शहरात वृक्ष लागवडीसाठी पुन्हा एकदा मोहीम जोर धरत आहे. कळंब शहराच्या वतीने शनिवारी म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा वृक्ष लागवडीचा इतिहास घडणार आहे. एकाच दिवशी शहरात 11111 झाडांची लागवड होणार आहे. त्यासाठी गेल्या एक महिन्यापासून तयारी सुरू आहे. एक महिन्यापासून कळंबकरांनी हरित कळंब करण्याच्या केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत 6 लाख 47 हजार रुपये निधी जमा झाला आहे.
कळंब शहरात मुख्य चौक ते कळंब- डिकसळ गाव हद्द,कळंब -हासेगाव हद्द,कळंब -मांजरा नदी व कळंब शहर परिसरात वृक्ष लागवड होणार आहे.
वृक्ष संवर्धन समितीचे उपविभागीय पोलिस अधिकारी एम. रमेश, पोलीस निरीक्षक सुरेश साबळे ,बाजार समिती संचालक विलास पाटील, पर्याय सामाजिक संस्थेचचे विश्वनाथ तोडकर, प्राथमिक शिक्षक महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे,आनंद बालाई,अभय देवडा,श्रीधर भवर ,मनोज चोंदे,महादेव महाराज अडसूळ ,प्रकाश भडंगे,कळंब तालुका पोलीस पाटील संघटनेसह विविध संघटनांनी सहभाग नोंदविला आहे.
पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राखण्यासाठी वृक्षांची संख्या कमी होऊन चालणार नाही. वृक्ष हे पर्यावरणातील खूप महत्वाचा भाग आहेत. आपल्या भोवताली असलेली झाडे आपल्याला फक्त सावली देत नाहीत तर वृक्षांपासून आपल्याला अनेक फायदे आहेत. वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड स्वतःकडे घेतात आणि जीवनावश्यक असा अक्सिजन आपल्याला देतात.
उपविभागीय पोलिस अधिकारी एम रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेस पोलीस प्रशासनही मोलाची भूमिका बजावत आहे.