आरंभ मराठी / धाराशिव
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजताच्या सुमारास विमान अपघातात दुःखद निधन झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून अजित दादा यांना श्रद्धांजली व्यक्त करण्यासोबतच विमानाच्या झालेल्या अपघाताबद्दल देखील संशय व्यक्त केला जात आहे.
अजितदादा ज्या विमान अपघातात मरण पावले,
ज्या LEARJET 45XR विमानामुळे त्यांचा मृत्यू झाला, ते विमान अवघ्या दोन वर्षांपूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये मुंबई विमानतळावर गंभीर अपघातग्रस्त झालं होतं. त्या अपघातात तीन जण जखमी झाले होते.
त्याचा अहवालही त्यावेळी दिला होता. अनेक तांत्रिक त्रुटी असलेल्या या सिरीजच्या विमानाला पुन्हा उड्डाणासाठी परवानगी कशी देण्यात आली? कोणी दिली? आणि विमान प्रवासावर नियंत्रण ठेवणाऱ्या DGCA ने काय केलं? यावर आता सर्व बाजूंनी संशय व्यक्त केला जात आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, VSR VENTURES या ऑपरेटरचं हे विमान आहे. ही कंपनी जुनी, रद्दी अवस्थेतील विमानं VVIP ड्युटीसाठी वापरत आली आहे, असं समजतं.
या कंपनीचं ऑफिस दिल्लीतील महिपालपूर येथे आहे.
या कंपनीचा मालक असलेल्या कॅप्टन रोहित सिंग या व्यक्तीला आज बऱ्याच जणांकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र विमानाचा अपघात झाल्यानंतर कॅप्टन रोहित सिंग नॉट रिचेबल असल्याचं समजतं. अजित दादांच्या मृत्यूबद्दल समाज माध्यमातून देखील संशय व्यक्त केला जात आहे. यासंदर्भात समाज माध्यमात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. अजित दादांच्या मृत्यूची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे अशीही मागणी समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होत आहे.










