प्रतिनिधी / पारगाव
वाशी तालुक्यातील पारगाव येथे राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते जलजीवन मिशन योजनेअंतर्गत साडेसात कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे भुमीपूजन करण्यात आले.यावेळी बोलताना त्यांनी गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली.
पारगावसाठी ईट येथील संगमेश्वर प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचे नियोजन करण्यात आले आहे. एक वर्षाच्या आत पारगावकरांना या पाण्याचा लाभ द्यावा, अशा सक्त सूचना पालकमंत्री डॉ. सावंत यांनी संबंधित अधिकारी यांना दिल्या आहेत. पाणीपुरवठा योजनेबरोबरच युवकांसाठी जिम तसेच पारगाव येथे दहा लाख रुपयाचे सिमेंट रस्त्याचे लोकार्पण,तसेच जाणकापूर येथे वीस लाख रुपयांच्या रस्त्याच्या मजबुतीकरण कामाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पारगाव व परिसरातील गावासाठी कसलाही निधी कमी पडू देणार नाही, असे सावंत म्हणाले. या कार्यक्रमासाठी सावंत यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, माजी जिल्हाप्रमुख गौतम लटके, दत्ता मोहिते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक केशव सावंत, वाशीचे तालुका प्रमुख सत्यवान गपाट, युवा सेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, शिवहर स्वामी, नितीन चेडे, नागनाथ नाईकवाडी, युवा सेना तालुकाप्रमुख प्रवीण गायकवाड, दिनकर शिंदे, रामराजे सातपुते, बंडू खोसे,भाजपा उपजिल्हाप्रमुख महादेव आखाडे,शिवसेना उप तालुकाप्रमुख विकास तळेकर, पं.स.सदस्या सविता तळेकर, राजा कोळी,आशोक जाधव, बाबा हारे, तानाजी कोकाटे,अशोक लाखे,विलास खवले, दत्ता जाधव, परिसरातील शिवसैनिक , भाजपाचे पदाधिकारी सरपंच उपसरपंच शाखाप्रमुख व विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.