प्रतिनिधी / धाराशिव
जिल्ह्यातील दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 16 व्या अधीमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.दिग्गज दापके-देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली रविवार (दि.27) स्वप्नराज मंगल कार्यालयात उत्साहात पार पडली.यावेळी संस्थापक डॉ. दिग्गज दापके-देशमुख यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले.यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे रुपामाता उद्योग समूहाचे अध्यक्ष ऍड. व्यंकट गुंड यांनी दिशा पतसंस्थेच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले, दिशा पतसंस्था सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक आहे.
तत्पूर्वी संस्थेचे अध्यक्ष डॉ दापके देशमुख यांनी सभासद भाग, भाग भांडवल, गंगाजळी व इतर निधी तसेच दरवर्षी ठेवी, शाखा विस्तार, ‘अ’ श्रेणी इ.बाबत समाधानकारक वाढ होत असल्याचे सांगून संस्थेच्या भाग भांडवलाची माहिती सांगितली.तसेच सभासदांना 13% प्रमाणे लाभांश जाहीर केला.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राजमुद्रा नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष धनाजी आनंदे यांचीही उपस्थिती होती..सहकार बोर्डाचे समन्वयक मधुकरराव जाधव यांनी उपस्थित संचालक,कर्मचारी, व सभासद यांना मार्गदर्शन केले. विषय वाचन पतसंस्थेचे सचिव पंकज पडवळ यांनी केले.
सभेस कुलस्वामिनी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक-सचिव प्राचार्य डॉ.रमेश दापके-देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर तडवळकर, संचालक इलियाज खान, सौ.शुभांगी पडवळ, डॉ.सौ.वसुधा दापके-देशमुख,
वाशी शाखा पालक संचालक प्रविण उंदरे,सुरज पडवळ आदींसह कर्मचारी, सभासद, ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन गजानन पाटील यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष राहूल माकोडे यांनी केले.