आरंभ मराठी / धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील एका गावात किचनचा धाक दाखवून २९ वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेने (नाव व गाव गोपनीय) दिलेल्या तक्रारीवरून संबंधित तरुणाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडितेच्या तक्रारीनुसार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास एका गावातील तरुणाने तिला गाडीवर बसवून आडरानात नेले. तेथे आरोपीने मोटरसायकल गाडीच्या किचनचा धाक दाखवत महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. घटनेनंतर भीती व मानसिक धक्क्यामुळे पीडिता काही दिवस शांत राहिली होती.
त्यानंतर दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी पीडितेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन प्रथम खबरी अहवाल दाखल केला. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेतील कलम ६४(१), ३५१(२) व ३५१(३) अन्वये तामलवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.









