आरंभ मराठी / तुळजापूर
पत्रकार म्हणून एका हॉटेल चालकाला दर महिन्याला पाच हजार रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंबधी सविस्तर वृत्त असे की,
आरोपी संतोष राजेंद्र दुधभाते रा. (वडगाव लाख ता. तुळजापूर जि धाराशिव) यांनी दिनांक 8 सप्टेंबर रोजी रात्री सात वाजण्याच्या सुमारास वडगाव लाख शिवारातील हॉटेल शंभु येथे फिर्यादी खंडु उमराव लोहार (वय 43 वर्षे, रा. वडगाव लाख ता. तुळजापूर) यांना आरोपीने मी पत्रकार आहे, मला दर महिन्याला पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल अशी मागणी केली.
त्यावर फिर्यादीने हप्ता देणार नाही असे सांगितले. यावरून दोघांमध्ये शिवीगाळ झाली. यामध्ये आरोपीने लाथाबुक्यांनी मारहाण करुन हातपाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी खंडु लोहार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 308(2),115(2), 352, 351(3) सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.